Tesla लवकरच स्वस्तातली इलेक्ट्रिक कार करणार लाँच , कारचे फीचर्सही दमदार

0

नुकतेच एलोन मस्क यांनी  म्हटले आहे की, त्यांची ऑटोमेकर टेस्ला (Automaker Tesla)  2023 या वर्षामध्ये मध्ये पहिली इलेक्ट्रिक कार सादर करण्यासाठी नियोजन करत आहे. टेस्ला कंपनीची ही इलेक्ट्रिक कार  25,000 डॉलर्स इतक्या किंमतीची म्हणजे अंदाजे 18 लाख एवढ्या किंमतीची असेल.  (Tesla may make cheap electric car worth 25000 USD without steering wheel)

इलेक्ट्रेकने सांगितल्याप्रमाणे, ऑटोमेकर टेस्ला कंपनीचे  सीईओनी दिलेल्या संकेतानुसार या इलेक्ट्रिक कारला स्टीयरिंग व्हील नसेल. म्हणजे ही कार तुम्हाला विना स्टीयरिंग व्हील पाहायला मिळेल.  एलोन मस्क यांनी याअगोदर देखील सांगितले होते टेस्ला कंपनी नवीन बॅटरी सेल व बॅटरी डेव्हलमेंट करत आहेत. यामुळेच टेस्ला कंपनीला नवीन इलेक्ट्रिक कार कमीत कमी किमतीमध्ये बाजारात आणणे शक्य होईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बॅटरीची किंमत 50 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

$ 25,000 म्हणजेच अंदाजे 18 लाख इतक्या किंमतीची टेस्ला (Tesla) इलेक्ट्रिक कार नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक असेल अशी अपेक्षा केली जात आहे. या नवीन इलेक्ट्रिक  कारचे चीनस्थित  गिगाफॅक्टरी शांघाय येथे उत्पादन (प्रोडक्शन) करण्याचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात करण्याचे उद्दिष्ट आहे.

Texas Public Utility Commission ने दाखल केलेल्या अर्जात, EV निर्मात्या कंपनीने त्यांच्या सहाय्यक टेस्ला एनर्जी व्हेंचर्स (Tesla Energy Ventures)  अंतर्गत रिटेल इलेक्ट्रिक प्रोव्हाइडर  बनण्याची विनंती केली आहे. टेस्ला कंपनी  सध्या ऑस्ट्रेलिया आणि यूके मध्ये रिटेल इलेक्ट्रिक प्लॅन देत आहे, ज्यामध्ये टेस्ला कडून डोमेस्टिक एनर्जी स्टोरेज  इंटीग्रेट करण्यावर भर देण्यात येतो.

टेस्लाची इलेक्ट्रिक कार  लवकरच भारतात

भारतीय कार बाजारामध्ये EV  जायंट टेस्लाच्या  एंट्रीची अनेक काळापासून वाट पहात आहेत. टेस्ला कंपनीला भारतात  चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून टेस्लाच्या चार मोडेल्सला रस्त्यावर चालवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

वाहन निर्मात्या कंपनीने हे शक्य करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, कारण कंपनीला देशातील त्यांच्या चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास मान्यता मिळाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर पोस्टिंगचा संदर्भ देत, ब्लूमबर्गने नोंदवले आहे की, टेस्लाच्या चार मॉडेल्सना भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे.

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर  पोस्टिंगमध्ये असे म्हटले आहे की, “चाचणी हे सुनिश्चित करते की टेस्ला कंपनीचे वाहन उत्सर्जन आणि सेफटीच्या व भारतातील रस्त्याच्या योग्यतेच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेतील  मागणीनुसार जुळते.”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.