‘गांजा’शेती मागणी अर्जावर प्रशासनाने आपली भूमिका केली स्पष्ट,’अनिल पाटील’यांनी घेतला मोठा निर्णय!

0

गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून शेतकऱ्यांचा ‘माल’ कवडीमोल भावाने विकला जात असल्याने,शेतकरी संतप्त असल्याचे चित्र आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने पाहिलं मिळत आहे.

शेतकरी आपला माल रस्त्यावर फेकून देतानाचे अनेक व्हिडिओ,आपण सोशल मीडियावर पाहिले असतील. नुकताच नाशिकच्या आदित्य जाधव यांचा रस्त्यावर टोमॅटो फेकून देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

वीस किलोच कॅरेट ३०,४० रुपयांना मागितल्याने,आदित्य जाधव प्रचंड संतापला आणि त्याने अक्षरशः टॉमॅटो रस्त्यावर फेकून दिला. आपली चार चाकी व्हॅन भरून आणलेला टॉमॅटो,आदित्य जाधवने रस्त्यावर फेकून दिल्याचा व्हिडिओ आपण देखील सोशल मीडियावर पाहिला असेल.

शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव नसल्याने,शेतीच्या मशागतीसाठी झालेला खर्चही निघत नसल्याचं अनेक शेतकरी सांगतात.

सोलापूर जिल्ह्यातील,मोहोळ येथील अनिल आबाजी पाटील यांचं देखील असंच म्हणणं आहे. आणि म्हणून अनिल पाटील यांनी थेट गांजा उत्पादनाची परवानगी पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली. त्यांनी जिल्हाधिकारी यांना लिहिलेलं पत्र प्रचंड वायरल देखील झालं होतं. ते आपणही पाहिलं असेल.

'गांजा'शेती करण्याची परवानगी मिळण्यासंदर्भातलं जिल्हाधिकारी यांना अनिल पाटील यांनी लिहिलेलं पत्र.

अनिल पाटील यांनी प्रशासनाला एक पत्र लिहित म्हटलं होतं,मी एक शेतकरी आहे. कोणत्याही पीकाला हमीभाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. आणि म्हणून मला गांजा उत्पादन करण्याची रितसर लेखी परवानगी १५ सप्टेंबरपर्यंत द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबरला आपल्या प्रशासनाची परवानगी मिळाली आहे,असे गृहीत धरून मी गांजा लागवड करणार असल्याचं त्यांनी जिल्हाधिकारी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं होतं

अनिल पाटील यांनी लिहिलेल्या पत्राला आता प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले आहे. अनिल पाटील यांनी गांजा शेती करण्याची मागितलेली परवानगी प्रशासनाकडून नाकारण्यात आली आहे. प्रशासनाने अर्जाला उत्तर देताना म्हटले आहे, कळविण्यात येते की,सदर पिकाची लागवड कायदेशीर नसल्याने,आपणास याबाबत परवानगी देता येत नाही. सबब आपला विनंती अर्ज निकाली काढण्यात येत आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांची सही असणारे,नोटीस अनिल पाटील यांना मिळाले असून,त्यांनी या नोटिस बाबत आपली भूमिका देखील स्पष्ट केली आहे. सदर पिकाची लागवड कायदेशीर नसल्याने, आपणास याबाबत परवानगी देता येत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र आम्ही यावर शांत बसणार नाही. असं अनिल पाटील यांनी महाराष्ट्र लोकशाहीशी फोनवर बोलताना सांगितले.

https://twitter.com/MahaLokshahi/status/1432703463226593287?s=19

 

आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी मिळून एक आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आंदोलन करण्यापूर्वी आम्ही प्रशासनाला उद्या बुधवारी पत्र एक देणार आहोत. आणि त्यानंतर सोमवारी आझाद मैदानावर मोठं आंदोलन उभा करणार आहे.

जोपर्यंत आमच्या शेतीमालाला हमीभाव मिळत नाही,तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही,तर पुढची दिशा काय घ्यायची? हे आझाद मैदानावरच ठरवलं जाईल. असं अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.