Headingley test; ‘कॅप्टन’चाही सपोर्ट नसताना पुजाराने खेळलेल्या इनिंगचे कौतुक तर व्हायलाच पाहिजे

0

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना हेडिंगलीच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यावर यजमानांनी मजबूत पकड मिळवली आहे.

भारताचा पहिला डाव अवघ्या ४० षटकात ७८ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भारतासमोर ४३२ धावांचा डोंगर उभारला.

सुरुवातीचे दोन दिवस इंग्लंडने भारतावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भारताचा या कसोटीत तिसऱ्याच दिवशी पराभव होईल की काय? असे वाटत होते. त्याचे कारण म्हणजे इंग्लंडकडे ३५४ धावांची असणारी बलाढ्य आघाडी, त्याचबरोबर पहिल्या डावात भारताने केलेली खराब फलंदाजी,त्यातच भारताची मधली फळी गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने अपयशी ठरत असल्याने, ही शंका उपस्थित करणं साहजिकच आहे.

या दोन्हीं गोष्टींचा विचार केला तर भारत या सामन्यात कुठपर्यंत टिकेल?असा प्रश्र्न अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करून होता. त्याचे कारण नंबर ३,४,५ या खेळाडूंनी २०२०/२१ या वर्षात अवघ्या २३,२४,२५ च्या सरासरीने धावा काढल्या आहेत. विराट कोहलीने १८ डावात २३ च्या सरासरीने अवघ्या ४१४ धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजाराने २५ डावात २४ च्या सरासरीने ५८० धावा केल्या आहेत. तर अजिंक्य रहाणेने २४ डावात २५ च्या सरासरीने ६०९ धावा केल्या आहेत.

विराट,रहाणे,पुजारा या तिघांनीही २३,२४,२५,च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तरीदेखील फक्त पुजाराच्याच डोक्यावर टांगती तलवार होती. एवढंच नाही तर ही इनिंग कदाचित पुजाराची शेवटची इनिंग ठरू शकते,असंही बोललं जात होतं. गेल्या काही दिवसांपासून पुजारावर क्रिकेट चाहत्यांनी आणि माध्यमांनी टीकेची झोड उडवली होती. फक्त माध्यमांनी नाही,तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपमध्ये पराभव झाल्यानंतर विराट कोहलीने देखील पुजराच्या खेळावर प्रश्न उपस्थित केला होता. पुजाराच्या जागेवर सूर्यकुमार यादवला खेळविण्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र २०२०/२१ या वर्षात सर्वात जास्त चेंडू खेळण्याच्या यादीत टॉप५ मध्ये पुजाराचेही नाव होते,ही गोष्ट नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नव्हती. तरी देखील पुजाराच्याच खेळावर अनेकांनी शंका उपस्थित केली. आणि पुजारावर अधिक दबाव वाढला.

काल तिसऱ्या दिवशी पुजाराने दोन सत्र खेळून काढली. फक्त खेळूनच नाही तर पुजाराने रोहित,विराटला देखील ओव्हरस्कोर केले. पुजाराने काल ५०च्या स्ट्राइक रेटने नाबाद ९१ धावांच्या केलेल्या सर्वोत्कृष्ट खेळीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. कॅप्टन,क्रिकेट चाहते,मीडिया या मंडळींनी पूजाराच्या खेळावर प्रश्न उपस्थित केला होता. इतका मोठा दबाव असतानाही,त्याच बरोबर आपल्या कॅप्टनचाही आपल्याला सपोर्ट नसताना पुजाराने खेळलेली ही इनिंग नक्कीच ग्रेट आहे.

जर आपण या सामन्यात जिवंत आहोत तर ते केवळ आणि केवळ चेत्तेश्वर पुजारमुळेच. हे कदापिही नाकारता येणार नाही. पुजाराच्या ‘स्ट्राइक रेट’विषयी नेहमी बोलले जाते. मात्र पूजारा सारखा धैर्य,संयम,चिकाटी,असणाऱ्या खेळाडूचा अशा परिस्थितीत खूप महत्वाचा रोल ठरतो. हे विसरता कामा नये. आणि आज तर त्याने ज्या अप्रोचने,ज्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केलीय,हे पाहता त्याने अनेकांना धक्का दिलाय. शिवाय टीकाकारांचे तोंड देखील बंद केलंय.

८८ टेस्ट सामन्यात जवळपास ४७ ची सरासरी टिकवणं नक्कीच सोपं नाही. तरीदेखील पुजारावर चहू बाजूंनी होणारी टीका एक क्रिकेट चाहता म्हणून नक्कीच रुचणारी नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने केलेली फलंदाजी कशी काय विसरून चालेल? ७४च्या सरासरीने १२५८ चेंडू खेळून ५२१ धावा काढत पुजाराने मालिकावीर पुरस्कार फटकवला होता. आपण ऑस्ट्रेलियात जाऊन पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. यात पुजाराचा सिंहाचा वाटा होता, हे कसे काय विसरून चालेल?

पुजाराने काल तिसऱ्या दिवशी ज्या आत्मविश्वासाने फलंदाजी केलीय,हे पाहता तो आज पुन्हा एकदा कमाल करु शकतो. यात अजिबात शंका नाही. कारण सध्या त्याच्याकडे’आत्मविश्वास’ आहे. सॉलिड डिफेन्स तर त्याच्याकडे नेमहीच होता. फलंदाजी करताना राहूल द्रविड नंतर धैर्य आणि संयम असणारा,सध्याच्या काळातला पुजारा हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. आज पुन्हा एकदा खेळपट्टीवर तग धरून तो भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले,असा विश्वास वाटतो. आणि मग खऱ्या अर्थाने आपला’शॉलिड डिफेन्स’ ‘पुजारा’ टिकाकारांच्या तोंडात घालेल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.