Taliban Income: तालिबानची एका वर्षाची कमाई 1, 11, 32, 55, 00, 000 रुपयांपेक्षा जास्त, कोण त्यांना हत्यार पुरवतं, पैसा कसा मिळवला जातोय, संपूर्ण माहिती

Taliban Income Sources: अमेरिका सरकारने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतला असल्याने , अगदी थोड्याच काळात तालिबान्यानी संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला. गझनी, कंदहार, चराग ए शरीफसारख्या मोठमोठ्या शहरांवर सहजपणे ताबा टाकला गेला. तालिबान्यांनी आता अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या  काबूलवरही तालिबानी झेंडा फडकवला. मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे  राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या दोघांनीही अफगाणिस्तानातून पलायन केले आहे.

हेसर्व घडत असताना  अनेकांना हा प्रश्न पडलाय की, तालिबानकडे एवढी ताकद कुठून आली? तालिबानला पैसा कोण पुरवत आहे?(Taliban money) तालिबान कशातून उत्पन्न मिळवते? तालिबानला हत्यार कोण पुरवतं? ह्या सगळ्या प्रश्नांची माहिती आपण घेणार आहोत.

तालिबानचं नेमकं उत्पन्न किती आहे याबाबत ठोस अशी माहिती स्वतः तालिबानकडेही नसेल. कारण त्यांचा कारभारच तसा आहे.  परंतु काही रिपोर्ट व अभ्यासानुसार तालिबानचं वार्षिक उत्पन्न 1 अरब डॉलर पेक्षा अधिक  आहे. संयुक्त राष्ट्राच्या जून 2021 च्या रिपोर्टनुसार, तालिबानचा  2011 वर्षांपर्यंत पर्यंत वार्षिक महसूल 300 मिलियन डॉलर एवढं होतं. गेल्या काही काळामध्ये उत्पन्नात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळते. 1.5 बिलियन डॉलर (1Billion Dollors) (Taliban Afghanistan Latest News) एवढं प्रचंड उत्पन्न आहे.

तालिबानच्या उत्पन्न कशातून मिळते?
अफगाणिस्तान देशाचा इतिहास हा अफूशी जोडला गेलाय. आतासुध्दा तालिबानींच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत नशेचा बाजारच आहे. दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे ज्या भागामध्ये तालिबानचा ताबा आहे, तेथील भागतातील इन्कम टॅक्स तालिबान वसूल करत असते .  बऱ्याच गुन्हेगारी स्वरुपाची काम तालिबान करते , त्यातून सुद्धा तालिबान्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळत असतो.  काही रिपोर्टनुसार-अफूसारख्या अन्य  पदार्थांच्या तस्करीतून देखील तालिबानला वर्षाला 460 मिलियन डॉलर एवढ्या मोठ्या प्रमाणात  उत्पन्न होत असते.

तालिबानी करतात नैसर्गिक संपत्तीचीही लूट:
अफगाणिस्तानमध्ये जी काही नैसर्गिक साधनसंपत्ती
आहे, त्याचीही  लूट तालिबान करत असते. उत्खनन  उद्योगातून तालिबानला 2020 मध्ये मोठ्या प्रमाणात फायदा झाला होता.  464 मिलियन डॉलरची कमाई यातून तालिबानला झालेली होती. (Source of Taliban Income) एवढ्या मोठ्या प्रमाणात तालिबान उत्पन्न घेत असते. सोबतच तालिबानला दान देखील  मोठ्या प्रमाणात मिळत आहे.   बिनसरकारी चॅरीटेबल फाऊंडेशन, तालिबानचे
जे श्रीमंत समर्थक आहेत, यांचा मोठ्या प्रमाणात निधी तालिबानला मिळत आहे.

रशिया देखील मदत करत असल्याचा अमेरीकेचा आरोप
एकेकाळी  रशियाचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये होते. त्यावेळी रशियन सैनिकांविरोधात अमेरिकेनं तालिबानला मदत केली असल्याचे. बोलले जाते.   त्यानंतर काही काळात रशियाचं विभाजन झालं. नंतरच्या काळात  रशियाचे सैन्यदेखील अफगाणिस्तानमधून रशियाला गेले.
अमेरीकेचं ट्विन टॉवर्स ओसामानं उडवले होते.

त्यानंतर अमेरीकेच्या रडारवर तालिबान आले.  अमेरिकेचा बदला घेण्यासाठी मग  रशियानं देखील तालिबानला मदत करायला सुरुवात केली. असा देखील   आरोप अमेरीका रशियावर करत आली आहे.
अमेरीकेच्या एका रिपोर्टनुसार, तालिबानला रशियाच हत्यार, पैसा आणि ट्रेनिंग  देत आलं आहे. ही गोष्ट खरी  आहे का?  यावर अजूनपर्यंत  देखील शिक्कामोर्तब झालेलं नाही.

पाकिस्तानची देखील तालिबानला मदत
हे  सत्य सर्वांसमोर आले आहे की पाकिस्तान तालिबानला मदत करत आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन्ही देशांची मोठी सीमा आहे.
काही रिपोर्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार तालिबानला पाकिस्तान सोबत इराण देखील मदत करत आहे.
(Pakistan Iran helps Taliban)

तालिबानच्या तुलनेत जे अफगाणिस्तान सरकार  दुबळं होतं असं दिसतंय. कारण 2018 मध्ये अफगाणिस्तान सरकारने 11 अरब डॉलर
खर्च केले. यामधील 80 टक्के पैसा हा परदेशी मदतीतून अफगाणिस्तानला मिळाला होता आलेला. त्याचवेळी तालिबाननं कुठलीही मेहनत
न करता किती तरी मोठ्या प्रमाणात पैसा गोळा  केला.

(taliban-income-talibans-annual-income-is-more-than-1-11-32-55-00-000-rupees-who-provides-weapons-how-to-get-money-complete-information)

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.