Photo | शौर्य फाउंडेशन च्या वतीने महाड येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप

Photo
Photo

महाड तालुक्यातील परंत आदिवासी वाडी या गावी शौर्य फाउंडेशन च्या वतीने पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. आदिवासी पाड्यातील ग्रामस्थांना फाउंडेशन च्या वतीने तेथील डॉक्टरांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले. त्यावेळी फाऊंडेशनचे प्रवीण कर्चे व सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. महाड तालुक्यातील बऱ्याच गावातील लोकांपर्यत ही मदत पोहोचवली जात आहे.

Photo
Photo

शौर्य फाउंडेशन नेहमीच विविध उपक्रम राबवत असते. कला क्रीडा व सामाजिक उपक्रम फाउंडेशन तर्फे नेहमीच राबवले जात असतात. नुकताच कोकणामध्ये आलेल्या पुरामुळे स्थानिक नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. स्थानिकांचे प्रपंच उघड्यावर पडले. सर्व नासधूस झाल्यामुळे येथील नागरिकांना मदतीची गरज असल्याने शौर्य फाउंडेशन ने लोकांना मदतीचे आवाहन करून मदत गोळा केली व पूरग्रस्तांपर्यंत मदत पोचवण्यात येत आहे.

आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. 

https://chat.whatsapp.com/Fk7g0agcsFu5dxH3tXKFbG

एक धर्म माणुसकीचा पूरग्रस्तांना मदत या उपक्रमा अंतर्गत शौर्य फाऊंडेशनचे प्रवीण रंगनाथ कर्चे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गरजू लोकांपर्यंत मदत पोचवण्यात येत आहे. धन्य किराणामाल, कपडे या स्वरूपात मदत पोहचवण्यात आली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.