Electric Shock: विजेच्या धक्क्याने मेंढपाळ तरुणाचा मृत्यू; महावितरण कढून टोलवाटोलवी.

Electric Shock:  पारगाव खंडाळा नजिक झाडावर चढून पाला काढत असताना मेंढपाळ तरुणाचा विद्युत वाहक तार झाडावर पडली असल्यामुळे विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. सदर घटनेमुळे पारगाव खंडाळा नजिक भागांत हळहळ व्यक्त केली जात आहे. तानाजी शिवाजी पिसाळ ( वय २०) असे मृत्यू झालेल्या मेंढपाळ तरुणाचे नाव आहे. (Death of a young shepherd by electric shock; Tolvatolvi from MSEDCL.)

तानाजी झाडावर मेंढ्यांना पाला पाडण्यासाठी  चढला होता. तेथून जाणारी विद्युत वाहक तार झाडावर पढली होती. परंतु झाडावर असल्यामुळे तानाजीला  तार दिसली नाही. झाडांची फांदी तुटल्यानंतर विद्युत तार तानाजीच्या अंगावर पडली व तानाजी झाडावरून खाली पडला. त्याच्या सोबत असणाऱ्या मुलाने त्याला सोडवण्यासाठी गेला असता त्याला विजेचा धक्का लागून तो बाजूला पडला. त्याने आरडाओरड केल्यानंतर त्या ठिकाणी लोक गोळा झाले. तानाजीला उपचारासाठी दाखल केले गेले परंतु उपचारा पूर्वीच तानाजीचा मृत्यू झाला होता.

तानाजी पिसाळ हा पैलवान होता. तानाजीची औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनी मध्ये निवड झाली होती. तानाजी हा उत्तम प्रतीचा पैलवान होता. त्याने कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेतले आहे. ६ महिन्यांपूर्वी तनाजीचा विवाह झाला होता. तानाजी काही दिवसांपासून आपल्या आई वडिलांना मेंढ्या पाळण्यासाठी मदत करत होता. तानाजी त्याच्या आईवडिलांना एकुलता एका मुलगा होता. ही घटना कळताच तानाजीचे वडील बेशुद्ध पडले. सदर घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महावितरणचे अधिकारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी  मुलाच्या हलगर्जीपणामुळे सदर  घटना घडली आहे असे म्हणत यामध्ये महावितरणची  चूक नाही असे सांगितले व आपली चूक नाही असे सांगितले. आम्हाला मदत करण्याऐवजी आम्हीच कसे चुकीचे आहे असे महावितरण अधिकारी सांगत होते.  त्याठिकाणी मृतांच्या नातेवाईकांना आधार देण्यासाठी  स्थानिक व राजकीय नेते आले नाहीत. आमची बाजू ऐकून  घेतली नाही. असे मृतांच्या नातेवाईकांनी सांगितले.

हातावर पोट असलेल्या तानाजीचे आईवडील उदरनिर्वाह करण्यासाठी मेंढ्या पाळतात. मग त्यांनी शेतात जाऊच नये का. धनगर समाजाची अशीच उपेक्षा होत राहणार का? तानाजी त्याच्या आईवडिलांचा शेवटचा आधार होता. कुटुंबीयांना महावितरणने मदत जाहीर करावी.  असे मत नातेवाईकांनी व्यक्त केले.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.