Tokyo Olympic 2021; मेरी कोमचा पराभव, ऑलिम्पिक मध्ये मिळवले या देशाने सर्वाधिक पदके

Tokyo Olympic 2021: टोकियो(जपान) या ठिकाणी गेले सात दिवस ऑलिम्पिक सामने चालू आहेत. असलेल्या ऑलम्पिकच्या सातव्या दिवशी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताला यंदाच्या ऑलिम्पिक मधील सर्वात पहिले पदक मीराबाई चानू यांनी मिळवून दिले. मिराबाईने देशाला रौप्य पदक मिळवून देत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. ऑलिम्पिकच्या इतिहासात दुसऱ्यांदा महिला वेटलिफ्टींगमध्ये देशाला पदक मिळवून दिले आहे. याआधी सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नम मल्लेश्वरी हिने पदक मिळवले होते. ऑलम्पिक स्पर्ध्येमध्ये सिल्वर पदक जिंकणारी मीराबाई चानू ही बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूनंतर पहिली भारतीय महिला आहे. ही बाब आपल्या देशाच्या दृष्टीने खूप अभिमानास्पद आहे.

सहावेळा विश्विजेतेपद पटकावलेल्या मेरिकोमचा पराभव झाला. फायनल 16 मध्ये मेरिकोमला पराभव स्वीकारावा लागला. इंग्रिट वालेंसियाने मेरिकोमचा पराभव करून उपउपात्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आज झालेल्या पहिल्या राऊंड पासून आक्रमक खेळत असल्यामुळे तिने विजय मिळवला. इंग्रिट वालेंसियाने रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल मिळवले होते. इंग्रिट वालेंसियाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ चालू केला होता.

मेरिकोमने आपल्या अनुभवाच्या जोरावर दुसऱ्या राउंडमध्ये देखील यश संपादन केले होते. मेरीला तिसऱ्या राउंड नंतर पराभव पत्करावा लागला. मेरिकोमच्या रूपाने भारताला पदक मिळण्याची आशा होती मात्र हे स्वप्न भंगल आहे. मेरिकोमला 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला. [Tokyo Olympics 2021 boxer Mary Com (India) lost boxer Ingrit Valencia (Columbia) defeated her ]

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आत्तापर्यंत प्रथम अमेरिका, द्वितीय क्रमांकावर चीन, तर तृतीय क्रमांकावर जपान आहे. अमेरिकेला आत्तापर्यंत 35 पदके मिळवली आहेत. त्यामध्ये तेरा सुवर्ण पदके, बारा सिल्वर पदके, दहा कांस्य पदकांचा समावेश आहे. दोन क्रमांकावर असलेल्या चीनकडे एकूण 28 पदके आहेत. त्यामध्ये 13 सुवर्ण पदके, 06 सिल्वर पदके, व 09 ब्रॉन्ज पदके आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपान कडे एकूण 22 पदके आहेत. त्यामध्ये तेरा सुवर्ण पदके, चार सिल्वर पदके, पाच ब्रॉन्ज पदके आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.