फलटण मध्ये लवकरच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड सेंटर होणार सुरू

गेले कित्येक महिने देशासह जगभरामध्ये कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. सध्या दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फलटण तालुक्यातसह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेक रुग्णांना उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागले आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे फलटण मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने अन्नदाता सन्मान योजना अंतर्गत कोविड केयर सेंटर उभारण्यात येणार आहे.

कृषी लक्ष्मी मल्टीपर्पज हॉल, जलनायक रामराजे नगर, फलटण पुसेगाव रोड, सब मार्केट वार्ड वाखरी या ठिकाणी कोविड केयर सेंटरचे उद्घाटन होणार आहे. रविवार दिनांक 31 मे 2021 रोजी या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन होत आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक म्हणून रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, स्वरूपराजे खर्डेकर हे मान्यवर उपस्थित असणार आहे

फलटण तालुक्यातील बातमी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून व्हॉट्सऍप ग्रुप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/IvMQvZ1V6rsCh5pcI94LUV

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.