पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे घेतले हे निर्णय, शाळा कॉलेज …

राज्यामध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. अचानकच कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम लावण्यात येत आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये  रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी लागू  करण्याचा निर्णय  प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्याचसोबत  पुण्यातील शाळा, कॉलेज  28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय  घेण्यात आला आहे.  पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

विवाह सोहळ्यास किंवा इतर समारंभांना होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  लग्न समारंभास किंवा इतर कार्यक्रमाला केवळ 200 जण उपस्थित राहू शकतात, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार  आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय  घेण्यात आला आहे. त्याचसोबत   पोलिसांची  परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही लग्नाला परवानगी नाही, असे देखील प्रशासनाकडून  सांगण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये (कॉलेज), कोचिंग क्लासेस (शिकवण्या) 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच त्या त्या विभागाला  जारी केले  जाणार आहेत. मात्र  उच्च शिक्षण घेणारे वर्ग निम्म्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.