तब्बल ४५ गुन्हे दाखल, ४० वेळा जेल तरीपण चोरी करायच्या नवीन पद्धती शोधतो ‘कालिया

चोरांच्या वेगवेगळ्या कहाण्या आणि किस्से तुम्ही ऐकले असतील. चोराला पकडल्यानंतर  चोर आपल्या चोरीचे खुलासे करतो आणि हे खूप धक्कादायक असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा चोराबद्दल सांगणार आहोत ज्याने आयुष्यभर फक्त चोऱ्या आणि चोऱ्याच केल्या आहेत.

हा शातीर चोर एका सेकंदामध्ये तुमचे पाकीट गायब करू शकतो. तो पोलिसांनादेखील घाबरत नाही आणि त्याला जेलमध्ये जाण्याचीदेखील भीती वाटत नाही. या अट्टल चोराचे नाव आहे कालिया ऊर्फ कालूराम पुत्र उत्तमारम आचार्य.

५० वर्षांच्या वयात त्याने २७ वर्षे फक्त चोऱ्या आणि चोऱ्याच केल्या आहेत. ३५ दिवसांपूर्वीच तो जेलमधून बाहेर आला होता आणि बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा  चोरी  करण्यास सुरुवात सुध्दा केली. ३० दिवसांमध्ये त्याने एक डझनपेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत.

बाडमेर शहरामध्ये चोरांचे प्रमाण वाढत असून पोलिसांनी पुन्हा कालियाच्या एका साथीदाराला अटक केली आहे. कालियाने वयाच्या २२ वर्षी  त्याने एका घरात चोरी केली होती त्यानंतर चोऱ्या करण्यात तो पटाईत झाला.

त्यानंतर त्याने कितीतरी  चोऱ्या केल्या आहेत. त्याने आतापर्यंत १०० पेक्षा अधिक चोऱ्या केल्या आहेत. कालिया च्या साथीदारांना अटक केल्यानंतर त्यांनी कबूल केले की त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये १२ पेक्षा जास्त चोऱ्या केल्या आहेत.

पोलीस या टोळीची कसून चौकशी करत आहेत. त्यांच्याकडून १ बाईक आणि १८ हजार रुपये असा ऐवज जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व सामान त्यांनी एका दुकानातून चोरले होते. मंदिर, दुकान, बंगले, मोबाईल चोरी, पॉकेटमारी अशा अनेक वेगवेगळ्या चोऱ्या त्यांनी आतापर्यंत केल्या आहेत.

पोलिसांनी कालियाला   पकडल्यानंतर तो सगळे गुन्हे कबूल करतो. मात्र त्याचे लग्न झालेले नाही. तुरुंगातून सुटून आला की   हा आरोपी पुन्हा चोऱ्या करायला लागतो. पोलीस  त्याला पकडतात आणि काही दिवसांनी आरोपी पुन्हा सुटून जातो. त्याचे साथीदारदेखील  यामध्ये सामील आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.