प्रसिद्ध अभिनेत्री सापडली मृतावस्थेत, आत्महत्येचा संशय 

बिग बॉस या शोमधील माजी स्पर्धक आणि कन्नड अभिनेत्री जयश्री रमैया ही सोमवारी दुपारी मृतावस्थेमध्ये सापडली. बंगळुरुमधील एका वृद्धाश्रमामध्ये तिचा मृतदेह आढळला. जयश्री रमैया यांनी आत्महत्या केली  असण्याची दाट शक्यता आहे. गेले अनेक महिने जयश्री नैराश्याचा सामना करत होती. जयश्री रमैया ने स्वतः तिच्या सोशल मीडिया पेजवरुन जीवन संपवण्याचेही संकेत दिले होते.

बिग बॉस कन्नडच्या तिसऱ्या सीझनमधून जयश्री रमैया यांना चांगली प्रसिद्धी आणि ओळख मिळाली. तिच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कन्नड चित्रपट सृष्टीला मोठा धक्का बसला आहे. तिचे अनेक चाहते आणि सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरुन जयश्रीला  श्रद्धांजली वाहिली आहे.

गेल्या वर्षी २०२० मध्ये नैराश्याचा सामना करत असल्याचे तिने सांगितले होते. २२ जून रोजी  जयश्रीने तिच्या फेसबुक पेज वर आपल्या मनात आत्महत्येचे विचार येत असल्याचे लिहिले होते. ‘गुडबाय’ असे तिने केलेल्या फेसबुक पोस्ट मध्ये लिहले होते . परंतु नंतर तिने ती पोस्ट काढून टाकली होतो  व ‘मी व्यवस्थित आणि सुरक्षित आहे. लव्ह यू ऑल’ अशा आशयाची पोस्ट केली होती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.