शिंगी/पिंप्री येथील विवाहितेची विहिरीत उडी मारून आत्महत्या ….

प्रतिनिधी गुलाब वाघ गंगापूर प्रतीनीधी…..

गंगापूर तालुक्यातील पींप्री येथील एका बावीस वर्षीय विवाहितेने विहीरीत ऊडी घेऊन आत्महत्या करत जिवन यात्रा संपवली असून मंदाकिनी योगेश बारहते असे या मृत महीलेचे नाव असून घटना २८ डीसेबंर रोजी उघडकीस आली.
पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार मंदाकिनी २७ डीसेबंर पासून बेपत्ता होती याबाबत पोलीसात नोंद करण्यात आली होती मंदाकीनी हीचे माहेर शिंगी आहे तर सासर पींप्री होते तीन वर्षांपूर्वी या महीलेचे पींप्री गावातील योगेश बरोबर रितीरिवाजा प्रमाणे लग्न झाले होते लग्नानंतर एक मुलगा देखील झाला मात्र घरच्या काही कारणांमुळे मंदाकिनी हीने नरहरी रांजणगाव शिवारातील बाराहाते यांच्या विहिरीत ऊडी घेत आत्महत्या करत जिवनयात्रा संपवली आहे या घटनेची माहिती ग्रामस्थांनी गंगापूर पोलिसांना कळवल्या वरुन पी एस आय घूसींगे, पोलीस हे. काँ गणेश खंडागळे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहास विहीरी बाहेर काढून गंगापूर ऊपजिल्हा रुग्णालयात डॉकटराणी तपासून मृत घोषित करून शवविच्छेदन करण्यात येनार आहे दरम्यान याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करून सदरचा गुन्हा शिल्लेगांव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.