दुचाकीच्या अपघातात बाभूळगाव येथील अल्पभूधारक जागीच शेतकरी ठार..

गुलाब वाघ औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी….

. तर चार गंभीर जखमी झाल्याची घटना…

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील लासुरस्टेशन-नागरे बाभुळगाव रस्त्यावरील समृद्धी मार्गाच्या पुलाजवळ सायंकाळी साडे सहाच्या सुमरास दोन दुचाकींचा समोरासमोर अपघाताची घटना घडली असून यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.


रमेश लक्ष्मण जाधव वय ३५ राहणार नागरे बाभुळगाव असे ठार झालेल्याअल्पभूधारक शेतकऱ्याचे नाव आहे.
दरम्यान शिल्लेगाव पोलिसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार लासूर स्टेशन ते नागरे बाभुळगाव रस्त्यावर दोन मोटर सायकलची समोरासमोर जोरदार अपघात झाल्याने या अपघातात रमेश लक्ष्मण जाधव याचा मुत्यु झाला असून सुखदेव निकम ना.बाभुळगाव,बाळु काळवणे मा.वाडगाव व आणखीन दोघेजन जखमी झाले असून त्यातील एक जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.


घटनेची माहिती मिळताच शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरक्षक रविंद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनिरीक्षक सतीश दिंडे पोलीस कर्मचारी दादाराव तिडके,विठ्ठल जाधव आदी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून अपघाताची माहिती घेतली यातील गंभीर जखमी असलेल्या नागरे बाभुळगाव येथील रमेश लक्ष्मण जाधव यास येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता तेथील डाॅ वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले


रमेश लक्ष्मण जाधव वय 35 ना बाभुळगाव हा अल्पभुधारक शेतकरी असून वेल्डरचे काम करून कुंटूबाचा उदनिर्वाह करत होते त्यांना तीन एकर जमीन असून काही कामा निम्मित लासूर स्टेशन कडे येताना मोटार सायकल च्या अपघातात त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परीवार आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.