एकेकाळी लग्नात जेवण वाढण्याचे काम करणारी राखी सावंत आज एवढ्या कोटींची मालकिण, घराची किंमत एकूण थक्क व्हाल

सिनेमा सृष्टी एक चंदेरी दुनिया आहे. सिनेमा सृष्टीत येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचे स्वप्न पुर्ण होत नसते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण माया नागरी मुंबईकडे रवाना होता असतात.  सिनेसृष्टीत आपला शिक्का उमटवण्यासाठी कलाकारांना खुप मेहनत करावी लागत असते. परंतु  तरीदेखील प्रत्येक व्यक्तीला  या क्षेत्रात यश मिळेल असे नाही.  या क्षेत्रात  यश मिळवण्यासाठी कलाकारांना दिवसरात्र मेहनत करावी लागत असते.

ज्या कलाकारांना अपयश येते. असे  कलाकार इंडस्ट्रीपासून लांब रहायलाच पसंद करतात किंवा काही ना काही कारणास्तव  नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक बॉलीवूडची तारका अभिनेत्री  राखी सांवत. राखी सावंत बिंधास्त स्वभावामूळे सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. राखी सावंतला ड्रामा क्वीन देखील बोलले जाते.

अशी ही  ड्रामा क्वीन राखी सावंत सतत या  ना त्या कारणामूळे चर्चेत असते. राखी  देशात सुरु असणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर  बिनधास्त मत मांडत असते. बऱ्याचदा तिच्या मत मांडल्यामुळे अनेक   वाद निर्माण करते. परंतु  तरीदेखील राखी सावंत थांबली नाही. राखीला वादाच्या भवऱ्यातत अडकणे खुप आवडत असते.

राखीच्या  सडेतोड  स्वभावामूळे  मिडीयासाठी देखील ती चर्चेचा विषय बनते.  राखी सावंत हे एक सिनेसृष्टीत प्रसिद्ध नाव आहे. अनेक कार्यक्रमांना राखी हजेरी लावत असते. राखीने हे सर्व आपल्या मेहनतीच्या जोरावर निर्माण केले आहे. तिचा हा बॉलीवूडमधला  प्रवास एवढा सोपा नव्हता.  राखीने इथपर्यंत पोहोचण्यासाठी बरीच मेहनत केली आहे.

राखी सावंत बायोग्राफी:

राखी सावंत ही  मूळची महाराष्ट्रियन आहे.  जन्म २५ नोव्हेंबर १९७८ रोजी झाला.  राखीचा जन्म  मुंबई महाराष्ट्रामध्ये झाला होता. राखीचे सावंतचे खरे नाव नीरु भेदा असे आहे. बॉलिवूड मध्ये  आल्यानंतर राखीने  तिचे नाव बदलून राखी सांवत असे केले .   एका मध्यमवर्गीय कुटूंबामध्ये राखीचा जन्म झाला.

राखीने आपले शालेय शिक्षण मुंबईमध्ये पुर्ण केले . घरची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामूळे तिला पुढील शिक्षण घेता आले नाही. तिला लहानपणापासूनच अभिनय आणि डान्स करण्यामध्ये आवड  होती.  लहान असतानाच ती नृत्य शिकायचा प्रयत्न करायची.

राखी सावंतने बॉलीवुड क्षेत्रात येण्याचा विचार निर्णय घेतला होता. तिने १९९७ च्या ‘अग्नीचक्र’ सिनेमामध्ये काम करून अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अनेक सिनेमामध्ये छोट्या छोट्या भुमिका साकारल्या.   राखीने अनेक चित्रपटांमध्ये डान्सर म्हणून देखील काम केले आहे.

राखी तिच्या बोल्ड आणि बेधडक स्वभावामूळे बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख मिळाली होती. राखीने हिंदीसोबतच मराठी, तेलगू, कन्नड, तामिळ, मल्ल्याळम अशा वेगवेगळ्या सिनेमामध्ये काम केले आहे. यासोबतच राखीने छोट्या पडद्यावर सुध्दा काम केले आहे.

राखी जेव्हा  बॉलीवूडमध्ये आली तेव्हापासून लोकांसाठी चर्चेचा विषय होती. तीच्या बोल्ड लुकमूळे राखीला अनेक सिनेमांमध्ये काम मिळाले होते. राखी सावंतने दिल का सौदा, जोरू का गुलाम, कुरुक्षेत्र, दम, ओम, मस्ती, सनम तरी कसम, खामोश, मुंबई एक्सप्रेस, एक कहाणी जुली की, धुम धडाका अशा  सिनेमामध्ये आपली छाप उमटवली आहे.

परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर देखील तिला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही. परंतु  तरीदेखील ती नेहमीच चर्चेत येत असते. राखी सावंतने परदेसिया या अल्बम मध्ये काम केले होते. राखीचे हे गाणं खुप सुपरहिट झाले होते. यानंतर अल्बम नंतर तिचा कोणताही अल्बम जास्त हिट झाला नाही.

सध्या राखी  करोडोची  मालकिण आहे. करोडो रुपयांच्या मालमत्तेची मालकी असलेल्या  राखीचे मुंबईमध्ये दोन फ्लॅट आहेत त्या सोबतच राखीचा एक मोठा बंगला देखील मुंबईमध्ये आहे. राखीच्या या  बंगल्याची किंमत तब्बल १५ करोड रुपये आहे. राखी सावंतची एकूण प्रॉपर्टी २० करोड एवढी आहे. तिच्याकडे अनेक महागड्या व आलिशान गाड्या आहेत.

परंतु  आज करोडो रुपयांची मालकिण असणारी राखी एकेकाळी लग्न समारंभमध्ये जेवण वाढायचे काम करत होती. राखी सावंतने टिना अंबानीच्या लग्नामध्ये जेवण वाढायचे काम केले होते. यासाठी राखीला ५० रुपये मिळाले होते. परंतु  आज तिच्याकडे पैशांची कमी नाही.

राखीने छोट्या पडद्यावर असणाऱ्या बिग बॉस, नच बलिये, राखी का स्वंयवर, राखी का इंसाफ यांसारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये देखील काम केले आहे.  सध्या स्टेज शोमध्ये काम करुन राखी पैसे कमावते. राखीची चर्चेत राहण्यासाठी काहीही करण्याची तयारी असते . कारण तिला चर्चेत राहायला खुप आवडते.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.