गो कोरोना गो’ नंतर आता आठवलें यांचा नवा नारा ‘नो कोरोना, कोरोना नो’

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व  केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांनी कोरोना भारतामध्ये येण्याआधी   ‘गो कोरोना, कोरोना गो’ असा नारा दिला होता. या नाऱ्याची चर्चा संपूर्ण देशात वेगाने  झाली होती. त्यांचा तो व्हिडिओ काही तासांमध्येच व्हायरल झाला होता. आता त्यांनी नव्या स्ट्रेनच्या धर्तीवर एक  नविनच नारा दिला आहे तो म्हणजे, ‘नो कोरोना, कोरोना नो’.

 कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच ज्यावेळी कॉरोणा चीनमध्ये घुसला होता त्यावेळीच त्याला हद्दपार करण्यासाठी ‘गो कोरोना, कोरोना गो’ असा नारा देणाऱ्या देशाचे केंद्रीय मंत्री व आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्याची छाया जगभर पसरत असताना एक नवीन नारा दिला आहे तो म्हणजे, ‘नो कोरोना, कोरोना नो.’ याबाबत रामदास आठवले यांना विचारले असता, नवीन कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी हा नारा दिल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे ब्रिटन मध्ये सापडलेला नवा स्ट्रेन?
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला  आहे.  हा नवा स्ट्रेन अगोदरच्या कोरोनापेक्षा  70 टक्के अधिक प्रभावी असल्याचे संशोधक सांगत आहेत.  त्यामुळे   भारताने व जगातील  अनेक देशांनी ब्रिटन मध्ये  जाणाऱ्या येणाऱ्या  विमानसेवांना स्थगिती दिली आहे.  अशाच प्रकारचा दुसरा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील सापडला आहे. त्यामुळे पुन्हा डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिबंध म्हणून अनेक पाऊले उचलली जात आहेत यामध्ये गेल्या महिन्याभरात ब्रिटनवरुन भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं सुरु असून त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

याबाबत केद्रीय आरोग्य मंत्रालयानकडून नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.  नियमा वलीनुसार नियोजन केले जात आहे.  25 नोव्हेंबर २०२० ते 23 डिसेंबर 2020 या 4 आठवड्यांमध्ये  ब्रिटनवरून भारतामधील वेगवेगळ्या राज्यामध्ये आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे आदेश ब्युरो ऑफ इमिग्रेशनला देण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन या प्रवाशांची माहिती  त्या प्रवाशांच्या संबंधित राज्यांना देणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.