सलग तीन दिवस बँका बंद

येणारे नववर्ष वर्ष साजरे करण्यासाठी आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असणाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. कारणही तसेच आहे, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. ज्यांची काही महत्वाची कामे असतील तर बँकेबाबत असणारी आपली सर्व कामे गुरुवारपर्यंत पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.

या आठवड्यात नाताळ हा सण आहे. शुक्रवार दिनांक. २५ डिसेंबर रोजी सर्व बँकांना सुट्टी असणार आहे, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक २६ डिसेंबर रोजी महिन्यातील चौथा शनिवार असल्यामुळे देखील बँका बंद असतील.

कारण, प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. व यानंतर रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल. या आठवड्यात सलग शुक्रवार, शनिवार, रविवार या तिन्ही दिवशी बँकांना बंद असणार आहेत.

त्याचबरोबर नवीन वर्ष सुरू होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांत काही बदल होत आहेत त्यामुळे बँकेचे व्यवहार वेळेतच पूर्ण करून घेणे योग्य ठरेल. त्याचबरोबर, ३१ डिसेंबर ही आयकर भरण्याची अंतिम तारीख आहे, त्यामुळे याबाबत दखल घेऊन आपली कामे पूर्ण करून घ्या.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.