50 लोकांना परवानगी असताना भाजपा आमदार राम सातपुते यांच्या लग्नात हजारोंनी केली गर्दी.

0

एकीकडे 50 लोकांना लग्न समारंभामध्ये परवानगी असताना भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांच्या लग्नात मात्र हजारो लोकांनी गर्दी केलेली महाराष्ट्र लोकशाहीच्या निदर्शनास आले. आमदार राम सातपुते हे भारतीय जनता पार्टीचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मग नियम फक्त सर्वसामान्य लोकांनाच का फक्त? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. बड्या लोकांवर नियमाचे पालन न केल्यामुळे कारवाई होणार का?

या विवाहप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघे सुध्दा या विवाह समारंभाला हजर होते. तसेच अनेक नेतेमंडळींनी या समारंभाला हजेरी लावली होती.

लोकप्रतिनिधिंनीच जर अशा प्रकारे नियम तोडले तर कसे चालेल? सर्वसामान्य लोकांना ५० लोकांची मर्यादा आणि लोकप्रतिनिधींना मात्र हजारो लोक एकत्र करण्याची परवानगी. नियम हे सर्वांना समानच असतात. नियमाचे पालन सर्वांनी करायचे असते.

भाजपा आमदार राम सातपुते यांच्या विवाह समारंभामध्ये कोरोणाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. एकीकडे हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्या ठिकाणी सोशल दिस्टनसिंगचा फज्जा उडवण्यात आला. त्या ठिकाणी लोकांनी मास्क वापरण्याचा नियमाचे देखील बारा वाजवले आहेत.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा मागासवर्ग आरक्षित आहे. या मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापणे पासून सोबत असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

मोहिते पाटील गटाला फलटण च्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली. मोहिते पाटील यांनी आपला शब्द राखत निंबाळकर यांना निवडून आणले. त्यांनतर मोहिते पाटील यांना राम सातपुते या नवख्या तरुणाला निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली. ही जबाबदारी देखील विजयसिंह मोहिते पाटील गटाने पार पाडली.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.