स्वातंत्र्यपुर्तीच्या सत्तरीनंतरही आज अर्नाळा किल्ला दुर्लक्षित

विदेश म्हात्रे

शासनाचे दुलर्क्ष आणि राजकारण्यांची निष्क्रीयता स्वातंत्र्यपुर्तीच्या सत्तरीनंतरही आज अर्नाळा किल्ला विविध समस्यावर उपाययोजना शोधत आहेत

अठरा वर्षापुर्वी प्रकाशदाता श्री रामभाऊ नाईक ( पेट्रोलिअम मंत्री, भारत सरकार ) यांच्या अथक प्रयत्नानी काळोखात गुडुप झालेले अर्नाळा किल्ला गाव प्रकाशमय झाले.


विदयुतीकरणानंतरच खऱ्या अर्थाने बाहेरील जगाची अन् , विकासाची कास धरायला सुरवात केली. आर्थिक दृष्टया मागासल्याकारणे प्राथमिक माध्यमिक शिक्षणाच्या पलिकडे जाणे कमी होते ते वाढले. आणि इथल्या तरूणांनी शिक्षणाची गरूडझेप घेऊन अगदी कमी काळात
शिक्षण, कला , क्रीडा , उद्योगधंदा व्यवसायात नेत्रदिपक प्रगती करताना दिसत आहेत.

मात्र शासनाच्या दुलर्क्षितपणा
अर्नाळा किल्ला गाव आज ही सोसत आहे


१ ) मुळात अर्नाळा किल्ला हे गाव समुद्रास बेट स्वरूपात असल्याने येण्याजाण्या साठी बोटीचा प्रवास हा एकमेव मार्ग आहे
भरती ओहटी ,उधाण वारा ह्याची पर्वा नाही हो ,
पण संध्याकाळी ७ वाजता फेरी बंद होते त्याआधी पोहचण्याची दगदग मनाला लागते
त्यातूनच सुशिक्षित बेरोजगारी सारखे
आणि वसई भाईंदरच्या पुढे कामाला कसे जावे हा प्रश्न पडतो

२) गावात दवाखाना नाही त्यामुळे रात्री अपरात्री एखादया रुग्णास, गर्भवती स्त्रीयांना पलिकडे अर्नाळा बोटीने न्यावे लागते मात्र वर्षानुवर्ष आरोग्यकेंद्राची मागणी होऊन ती पुर्ण होताना दिसत नाही

३ ) पर्यटन क्षेत्र म्हणून ऐतिहासिक अर्नाळा किल्ला गावाला समुद्री पुलाची (ब्रीज ) आवश्यकता आहे ती पुर्ण न करता मात्र शासन चढउतारासाठी ४ वर्षापासुन जेट्टी कुर्मगतीने बांधत आहे तिला काम पुर्ण होण्याची आशा दिसत नाही
४ ) धुप प्रतिबंधक बांधारा मंजुर होऊन काम सुरू झालंय खरं पण याच गतीनं काम चालू राहीलं तर येत्या पावसाळ्यात अजून २०-३० घरे समुद्र गिळंकृत करणार अशी भीती येथील नागरीक व्यक्त करीत आहेत

शब्दांकन
विदेश म्हात्रे -सदस्य, युवा किल्लेकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.