आयपीएलमध्ये मॅक्सवेल खेळण्यासाठी नाही तर,दारू पिण्यासाठी येतो! वाचा सविस्तर!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या निर्धारित घटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाने एकदिवसीय तर,भारताने टि-ट्वेंटी मालिकेत 2-1 अशी बाजी मारली. मात्र या मालिकेतील विजयापेक्षा दोन्ही मालिकेत ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या कामगिरीविषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

या मालिकेत ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या कामगिरी विषयी आश्र्चर्य व्यक्त करण्याचे कारण म्हणजे,त्याला दुबईमध्ये झालेल्या आयपीएलमध्ये एकाही सामन्यात लई पकडता आली नाही. तर याऊलट भारताविरुद्धच्या दोन्ही मालिकांमध्ये त्याने बहारदार खेळ करत सर्वांना आश्र्चर्यचकित केले. या मालिकांमध्ये त्याने बहारदार खेळ केल्यामुळे त्याच्यावर वीरेंद्र सेहवागने जहरी टीका केली.

भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सहवाग एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाला,मॅक्सवेल आयपीएलमध्ये खेळताना मला कधीही सिरीयस वाटला नाही. तो आयपीएलमध्ये फक्त मनोरंजन आणि पैशासाठी येतो. त्याचबरोबर वीरेंद्र सेहवागने ग्लेन मॅक्सवेलला तो दहा कोटीची चीअर लीडर असल्याचही वादग्रस्त विधान केलं. सेहवागच्या विधानाला उत्तर देताना ग्लेन मॅक्सवेल म्हणाला,सेहवाग मीडियामध्ये चर्चेत राहण्यासाठी असे विधान करत असतो.

दोघांनी एकमेकांवर केलेल्या शाब्दिक चकमकीनंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. दोघांच्या या वादानंतर कोणाची काय प्रतिक्रिया येतेय? हे पाहणं खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.