8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी भारत बंद’ची हाक का दिली? वाचा सविस्तर!
गेल्या बारा दिवसांपासून हरियाणा पंजाब तसेच देशभरातील शेतकरी,दिल्लीच्या सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात हजारोंच्या संख्येने आंदोलन करत असून शेतकऱ्यांनी उद्या८ डिसेंबरला भारत बंदची हाक देखील दिली आहे.
हे शेतकरी गेल्या बारा दिवसांपासूनच आंदोलन करत आहेत असं नाही,तर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात हे शेतकरी हरियाणा आणि पंजाबमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करत होते. मात्र याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले नसल्याने, या शेतकऱ्यांनी आपल्या फौजफाट्याची वाटचाल दिल्लीच्या दिशेने चालवली.
या शेतकऱ्याने दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. मात्र केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर अडवले. हे शेतकरी आपले आंदोलन घेऊन दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत,हे पाहून गृहमंत्री अमित शहांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे,असे विधान केले. मात्र पुढे चर्चा करूनही या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत.
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना तत्काळ माघार घ्यावे,अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे कायदे माघार घेतले जाणार नाहीत,यावर केंद्र सरकार ठाम असल्याने,सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्या ८ डिसेंबरला भारत बंद’ची हाक देत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.
आंदोलन करणाऱ्या काही शेतकरी संघटनांचे प्रमुख आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये कृषी कायद्याविषयीची पुढची चर्चा, नऊ डिसेंबरला होणार आहे. मात्र आठ डिसेंबरला या शेतक-यांनी भारत बंदला हाक दिली आहे. 8 डिसेंबरला बंदची हाक दिल्याने, आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली एक प्रकारची ताकद दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. असं असलं तरी,जर केंद्र सरकारने हे कायदे माघार घेतले नाहीत,तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. यावर शेतकरी ठाम आहेत. एवढेच नाही तर,या शेतकऱ्यांनी आपल्या जेवणाची सोय केली आहे. पुढचे सहा-आठ महिने,पुरेल एवढे जेवणाचे साहित्य घेऊन ही मंडळी आली आहेत. पूर्ण नियोजनबद्ध शेतकऱ्यांचे एवढं मोठं आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला, देशभरातील अनेक प्रमुख संघटनांनी देखील पाठिंबा दर्शवलाय. एवढेच नाही तर,अनेक नॅशनल पुरस्कार प्राप्त खेळाडूंनीही भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्याने काही खेळाडूंनी नॅशनल पुरस्कारही सरकारला परत केले आहेत.
शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला देशभरातून किती प्रतिसाद मिळतो आहे? हे पाहणे खूप औत्सुक्याचे ठरणार आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.