कोरोनाचे नियम तोडले म्हणून गोळ्या झाडल्या.
गेले वर्षभर चीन मध्ये उदयास आलेल्या कारोणाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेक देशांमध्ये निर्बंध लावण्यात आले आहेत आणि कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे. भारतासारख्या देशात सुध्दा पुन्हा कोरोणाची लाट येऊ पहात आहे. याचदरम्यान उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग पुन्हा चर्चेत आले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीपासून किम जोंग हे कोरोना ग्रस्तांशी एखाद्या माथेफिरु सारखे वागत आहेत.
किम जोंग यांनी उत्तर कोरियामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्बंध लावले आहेत. जो नियम मोडेल त्याला कठोर शिक्षा केली जात आहे. असंच एका व्यक्तीने कोरोनाचे नियम मोडले ते तर त्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देण्यात आली.
उत्तर कोरिया मध्ये किम जोंग हे हुकुमशाही दिवसेंदिवस लादत आहेत. त्या ठिकाणी कुठलीही लोकशाही अस्तित्वात येऊ नये असे किम जॉंग याचे म्हणणे आहे. किम याने घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. किम जोंग यांनी त्याला मृत्युदंड दिला आहे. या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून ठार करण्यात आले. त्याला अमानुषपणे गोळ्या घालण्यात आल्या.
किम जाेंग हा नेहमी आपल्या जनतेला आपल्या स्वतच्या दहशतीच्या जोरावर त्यांचा आवाज दाबत आहे. एवढच नाही किम जोंग यांनी जनतेमध्ये भितीचे वातावरण तयार व्हावे म्हणून अँटी एअरक्राफ्ट बंदुका तैनात केल्या आहेत. त्या बंदुकीद्वारे एक किलोमीटर एवढ्या लांबच्या पल्ल्यापर्यंत कोणालाही गोळ्या घालता येतात.
किम जॉंंग हा आपल्या जनतेवर अमानुष वागणूक देत आहे. किम हा नेहमीच आपली दहशत माजवत आहेत. किम जॉंग हा तेथील जनतेला सर्वसामान्य जीवन जगून देत नाही. किम जॉंग लोकांशी अमानुषपणे वागतो व त्याचा व्हिडिओ व्हायरल करत असतो व लोकांना भीती दाखवत असतो.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार २८ नोव्हेंबरला एका व्यक्तीला कोरोनाचे नियम न पाळल्याने मृत्युदंड देण्यात आला. नियम मोडत त्या व्यक्तीने चिनी सामानाची तस्करी केली होती असा आरोप त्याच्यावर होता.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.