अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीचे वारसदार हे आहेत.
अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूड मध्ये एंट्री केल्यापासून त्यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत.
अमिताभ गेले ५० वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. म्हणून त्यांना बिग बी असे देखील लोक संभोततात. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले साम्राज्य उभे केले आहे. त्यांना बॉलिवूड वारसा नाही. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे अमिताभ बच्चन करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक देखील आहेत. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचे चित्रपट हे हिट होत असतात. अमिताभ बच्चन हे आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर काही कंपन्यांचे जाहिराती सुध्दा करत आहेत.
फिल्म आणि जाहिरातींमधून त्यांनी त्यांनी भरमसाठ संपत्ती निर्माण केली आहे. अमिताभ यांच्या एकूण संपत्तीचा विचार करता ते २८०० कोटी रुपयांचे मालक आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे अमिताभ यांनी ५०० रुपये महिना या पगारावर देखील काम केले आहे आणि आज त्यांची संपत्ती 2800 कोटी रुपये एवढी आहे.
अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत घेतली आहे. कोणीच एकाच दिवसात यशस्वी होत नसते. सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांनी ‘बॉम्बे टू गोवा’ या फिल्म मध्ये बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. त्यानंतर अमिताभ यांचा ‘झंजिर’ चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट झाला होता. त्यांनी अनेक सुपरहिट फिल्म्स मध्ये काम केले. जाहिरातींच्या व चित्रपटाच्या माध्यमातून ते वर्षाला एकूण ५४ करोड रुपये कमवतात.
त्यांनी त्यांच्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक केली असल्यामुळे त्यांच्या त्यांना अजुनच फायदा होत आहे. अमिताभ हे शेअर मार्केट मध्ये आपली गुंतवणूक करत असतात. त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक योग्य ठिकाणी असल्यामुळे देखील त्यांना चांगला मोबदला मिळत असतो. अमिताभ यांच्या या संपत्तीबाबत अनेक वाद देखील आहेत.
महानायक अमिताभ बच्चन चार बंगल्याचे मालक आहेत. अमिताभच्या प्रतिक्षा बंगल्याबद्दल सगळ्यांच माहीती आहे. त्यांच्या या घराची किंमत १६० करोड रुपये आहे. प्रतिक्षा बंगल्यासोबतच त्यांच्याकडे जलसा बंगला देखील आहे. त्यांच्या या बंगल्याची किंमत देखील खुप जास्त आहे.
अमिताभ बच्चन यांच्या झनक या बंगल्याची किंमत देखील खुप मोठी आहे. त्यांच्या झनक या बंगल्यात अमिताभ बच्चन यांचे ऑफिस आहे. त्यासोबतच या बंगल्यात अमिताभ यांच्या कुटुंबीयांसाठी जीम देखील आहे . सर्व बच्चन कुटुंबीय याच ठिकाणी व्यायाम करण्यासाठी जात असतात. सर्व सोयोयुक्त असा अमिताभ यांचा झनक बंगला आहे. अमिताभ यांना बीएमडब्ल्यू, ऑडी, पोर्ष लेक्सस अशा लक्झरी कार देखील आहेत. या गाड्यांच्या किंमती देखील खूप अवाढव्य आहेत.
अमिताभ बच्चन हे महागड्या घड्याळाचे देखील शौकीन आहेत. त्यांच्याकडे अनेक महागडी घड्याळे देखील आहेत. अमिताभ यांच्याकडे लाखो रुपये किंमतीची घड्याळे देखील आहेत.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या २८०० करोड रुपयांच्या संपत्तीच्या वारसदाराचे नाव जाहीर केले आहे. अमिताभने सोशल मीडियावर या बाबत माहीती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या संपत्ती ही अभिषेक आणि श्वेता बच्चन या दोघांनाही समान स्वरूपात मिळेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.