शेतकऱ्यांच्या मागणीविषयी सरकार सकारात्मक नसल्याने या बड्या नेत्याने पद्मविभूषण पुरस्कार केला परत!

नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रांच्या मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर जाणार असं वाटतं होतं, मात्र केंद्र सरकारला या गोष्टीचा फार काही फरक पडल्याचे दिसून आले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीला सकारात्मकतेने पाहत नसल्यामुळे,शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांनी देखील या प्रकरणात उडी घेत खूप मोठा निर्णय घेतला आहे.

काही दिवसापूर्वी नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या खेळाडूंनी देखील शेतकऱ्यांना दिल्लीमध्ये जाण्यास परवानगी न दिल्यामुळे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर केंद्राकडून आपल्याला मिळालेले पुरस्कारही आपण केंद्र सरकारला परत करणार असल्याची मोठी घोषणा केली होती. आमच्या वडीलधाऱ्यांचा,मोठ्या बंधूंच्या पगडीचा सन्मान होत नसेल तर, आम्हाला मिळालेले पुरस्कार काय कामाचे? असा संतप्त सवाल या खेळाडूंनी उपस्थित करत आपला आक्रोश व्यक्त केला होता.

या नॅशनल पुरस्कार प्राप्त खेळाडू नंतर एन डी ए च्या स्थापनेपासूनचा सोबती शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांनी देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देत मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना एक पत्र लिहित प्रकाश सिंग बादल यांनी या कायद्यामुळे शेतकरी संतप्त आहे. केंद्र सरकार याविषयी सकारात्मक दिसून येत नाही. आणि म्हणून मी केंद्राचा प्रतिष्ठित मानला जाणारा पद्मभूषण पुरस्कार केंद्राला परत करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी अकाली दलाच्या नेत्या हरसीरमत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली होती.

केंद्राने तयार केलेल्या नव्या शेती कायद्याविरोधात कमालीची वातावरण तापले असून,येणाऱ्या काही दिवसात केंद्र सरकार बॅकफूटवर जाण्याची दाट शक्यता तज्ञाकडून वर्तविण्यात येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.