शक्तीचा वापर करून अण्णदात्याला दुखापत झाल्याने,खेळाडूही संतप्त. म्हणाले मिळालेले सर्व पुरस्कार करणार माघारी!

शेतकरी आंदोलनाची धग सर्व क्षेत्राला पोहोचली असून विविध क्षेत्रातील मंडळी नव्या कृषी विधेयक कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवल्याचे दिसून येत आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेले हे आंदोलन आता दिल्ली पर्यंत येउन पोहोचले असून केंद्र सरकारने या आंदोलनाविषयी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाविषयी केंद्र सरकार गंभीर नाही,असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे. मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना या विधेयकांविषयी चुकीची माहिती विरोधकांनी दिली आहे. त्याचबरोबर नव्या कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांमध्ये गैरसमज झाला आहे. असं केंद्र सरकारने म्हटल्याने, शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी आम्हाला दिल्लीत प्रवेश मिळावा आणि जंतर-मंतरवर आंदोलन करण्याची परवानगी मिळाली. अशी भूमिका घेतली. मात्र केंद्र सरकारने त्यांची ही मागणी नाकारत,अमित शहा यांनी शेतकऱ्यांना बुराडी मैदानावर आंदोलन करण्याचा पर्याय सुचवला. अमित शहा यांनी सुचवलेला पर्याय शेतकऱ्यांना मान्य नसून गेले सहा दिवस सिंघु आणि टिकरी या सीमांवर शेतकरी या कायद्याविरोधात लढा देत आहेत.

काल कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी अनेक शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बोलावलं होतं. मात्र थोड्यावेळाने त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्विट केलं. आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नाराजीची लाट उसळली. कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी, आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करत म्हटलं होतं, शेतकऱ्यांचा झालेला गैरसमज दूर करण्यासाठी शेतकरी बैठक बोलवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना गैरसमज झाला आहे. असं केंद्र सरकार म्हणत आहे,असा प्रश्न माध्यमांनी शेतकऱ्यांना विचारला. या प्रश्नांना उत्तर देताना शेतकरी म्हणाले, गैरसमज आम्हाला नाही, सरकारला झाला आहे. गेले चार महिने आम्ही शेती सोडून मूलबाळं सोडून गारठ्यात उघड्यावर आंदोलन करत आहे, वेडे आहोत का? एवढेच नाही तर गेल्या दोन दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनी देखील शेतकऱ्यांना या विधेयकाविषयी गैरसमज झाला आहे. हे विधेयक गंगेसारखं पवित्र आहे,असं म्हटलं होतं. यावरून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर सकारात्मक चर्चा करणार नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर पंजाब हरियाणा मधील पद्मश्री,अर्जुन पुरस्कार मिळालेल्या अनेक खेळाडूंनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. फक्त पाठिंबाच नाही तर, या खेळाडूंनी त्यांना मिळालेले पुरस्कारही केंद्र सरकारला परत करण्याची भूमिका घेतली आहे.

पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार मिळालेले करतार सिंग,अर्जुन अवॉर्ड मिळालेले,बास्केटबॉल खेळाडू सज्जन सिंह, हॉकी खेळाडू राजबीर कौर, यासह अनेक खेळाडूंनी 5 डिसेंबरला आम्ही,आम्हाला मिळालेले सर्व पुरस्कार,केंद्र सरकारला देणार असल्याची घोषणा केली आहे. हे खेळाडू म्हणाले,आम्हीदेखील शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. शांतीपूर्ण मार्गाने दिल्लीला जात असणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या गेल्या, पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला गेला. जर वडीलधाऱ्यांच्या आणि आमच्या मोठ्या भावांच्या पगडीचा अशाप्रकारे अपमान होत असेल तर,हे पुरस्कार काय कामाचे? असा संतप्त सवाल या खेळाडूंनी उपस्थित करत आपला आक्रोश व्यक्त केला.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.