भारताचा सलग दुसरा पराभव झाला असला तरी, चर्चा ‘त्या’ तरुणाची! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये काल सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनामध्ये एक खूपच रंजक घटना घडली.
सलग दुसर्या एकदिवसीय सामन्यात भारताचा पराभव झाल्याने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतावर गमावण्याची नामुष्की आली. पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणे याही सामन्यात भारतीय गोलंदाजांना लय पकडता आली नाही. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज याही सामन्यात भारतीय गोलंदाजांवर तुटून पडले. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या सामन्यात 374 तर दुसऱ्या सामन्यात 389 धावा कुटल्या. पहिल्या सामन्यात भारताचा 66तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव झाला. भारताचा हा सलग पाचवा एकदिवसीय पराभव होता. मात्र या सामन्या पेक्षा मैदानाबाहेर स्टेडियममध्ये एका भारतीय तरुणाने सुरू केलेल्या इनिंगची चर्चा खूप जोरात झाली.
सिडनी क्रिकेट मैदानावर दुसरा एकदिवसीय सामना चालू असताना मैदानाबाहेर स्टेडियममध्ये एक भारतीय तरुण आपल्या आयुष्याची इनिंग सुरू करताना दिसला. त्याचे झाले असे की, एका भारतीय तरूणाने एका ऑस्ट्रेलियन तरुणीला आपल्या खास शैलीत वेडिंग रिंग देत प्रपोज केले. विशेष म्हणजे तिने त्या प्रपोजचा स्वीकारही केला. हे चित्र कॅमेरामनने आपल्या कॅमेरात टिपले,आणि ही घटना क्षणात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.
भारतीय तरुणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला वेडिंग रिंग देत प्रपोज केले. हा प्रकार खेळाडूंनीही पाहिला,आणि टाळ्या वाजवत या दोघांचे अभिनंदन देखील केल्याचे दृश्य पाहायला मिळाले. या दोघांनी स्टेडियममध्ये किस देखील केले. भारतीय तरुण भारतीय क्रिकेट संघाच्या निळ्या जर्सीमध्ये होता,तर ऑस्ट्रेलियन तरुणी ऑस्ट्रेलियाच्या पिवळ्या जर्सीमध्ये होती. हे दोघेही आपापल्या देशाला सपोर्ट करताना दिसून येत असल्यामुळे हा मोमेंट खूपच प्रकाशझोकात आला.
या दोघांचा प्रपोज करतानाचा व्हिडीओ सिडनी क्रिकेट ग्राउंड या अधिकृत ट्विटर हँडलने पोस्ट करत Where dreams come true असं त्यांनी भन्नाट कॅप्शनही दिलं आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम