आदिवासी खेळाडूंना नोकरी देताना होतोय अन्याय: इंटरनॅशनल खेळाडू कविता राऊत


खरेतर खेळाडू हे देशाची शान असतात. त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडू हे तर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व जगासमोर करत असतात.  आपल्या जीवाची बाजी लावून खेळासाठी मैदानात जिंकण्याचा प्रयत्न करत असतात. देशाचे नाव मोठे करण्यासाठी लढत असतात. आजकाल मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी होत चालले आहेत. तरूण पिढी मोबाईल वरील गेम्स खेळत आहेत. त्यांना मैदानी खेळाची गरज वाटत नाही. तरूण पिढी आळशी होत चालली आहे. अशावेळी खेळाचे महत्त्व अजुनच वाढते.

खेळाडूंसाठी असलेल्या शासकीय सेवेच्या जागांच्या  कोट्यात क्लास वन च्या जागा शिल्लक असताना देखील व क्लास वन दर्जाच्या पोस्ट ला पात्र असताना देखील क्लास वन शासकीय सेवेत सामाविष्ट करून घेण्यात येत नसल्यामुळे  कविता राऊत या नाराज आहेत.   आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांनी राजभवन या ठिकाणी जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यपाल यांच्याजवळ कविता राऊत यांनी आपली कैफियत मांडली . आपल्यापेक्षा कमी कामगिरी केलेल्या आणि माझ्यानंतर अर्ज करून देखील  खेळाडूंना थेट क्लास वन (प्रथम श्रेणी) शासकीय सेवेत समाविष्ट करून घेतले असल्याची  तक्रार कविता राऊत यांनी राज्यपाल कोष्यारी यांच्याजवळ केली.  आपण अनुसूचित प्रवर्गातील असल्यामुळे आपल्याला जाणूनबुजून डावलले जात आहे, अशी खंत तिने व्यक्त केली आहे.

कविता राऊत यांनी राज्यपाल कोष्यारी यांची भेट घेऊन त्यांना आपल्यावरती झालेल्या   अन्यायाची माहिती निवेदनाव्दारे दिली. मी अनेक वेळा भारताचे इंटरनॅशनल लेव्हल ला  प्रतिनिधित्व केलेले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा, आशिया क्रीडा स्पर्धा त्याचसोबत  अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल  स्पर्धामध्ये सहभागी होऊन पदक देखील  मिळवली आहेत. २०१६ साली झालेल्या  ऑलिम्पिकच्या मॅरेथॉनमध्ये कविता राऊत यांनी  सहभाग घेतला होता. शासनाचे अनेक पुरस्कार कविता राऊत यांना मिळाले आहेत.

कविता या पदवीधर देखील आहेत. कविताने शासकीय नोकरीसाठी लागणाऱ्या शिक्षणाची देखील पूर्तता केली आहे. त्यांनी  क्लास वन पोस्ट मिळावी म्हणून अर्ज केला होता. शासनाच्या निर्णयानुसार आपण शासकीय सेवेत थेट क्लास वन  पदासाठी पात्र आहोत. परंतु मला डावलले गेले व   माझ्यानंतर अर्ज केलेल्या खेळांडूची नियुक्ती प्रथमश्रेणीमध्ये करण्यात  आले आहे. या ठिकाणी पक्षपात झाल्याचे   कविताने निवेदनात नमूद केले आहे.आपल्यापेक्षा  कमी स्पर्धामध्ये सहभागी होऊनी काही  खेळांडूना शासकीय सेवेत समाविष्ट करून  घेण्यात आले आहे.

कविता यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातून येऊन इंटरनॅशनल लेव्हल पर्यंत  गरुडझेप घेतली असताना देखील आपल्यावर हा अन्याय का? असा प्रतीसवाल त्यांनी केला आहे. नॅशनल  व इंटरनॅशनल लेव्हल वरती चमकदार  कामगिरी करून देखील माझ्यासारख्या अनेक खेळाडूंवर शासकीय सेवेत नोकरी देताना अन्याय होत असल्याची खंत कविता राऊत यांनी व्यक्त केली आहे. आदिवासी खेळाडूंवर अशा प्रकारचा अन्याय होत आहे.

खरे पाहता भारतासारख्या धर्मनिरपेक्ष व घटनात्मक देशाला शोभेल अशी ही बाब नाही. अशा प्रकारच्या पक्षपाती पणामुळे आपण भविष्यात चांगले खेळाडू गमावून बसू. कारण समाजात अशा प्रकारचा संदेश गेला तर विपरीत घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेळाडूंच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा दूजाभाव होणे कुठेतरी थांबवायला हवे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.