शेवटच्या 282 चेंडूनंतर जसप्रीत बुमराहला मिळाली विकेट! ऑलराऊंडर नसल्याने भारतासमोर चिंताच चिंता! वाचा सविस्तर!

0

बहुप्रतिक्षेनंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत दौऱ्याची सुरुवात झाली. काल शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या गोलंदाजीची ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरशः हवा काढली. भारताच्या एकाही गोलंदाजाला लय पकडता आली नाही. सिम गोलंदाजीसाठी परिचीत असणाऱ्या मोहम्मद शमीने थोड्याफार प्रमाणात आपल्या गोलंदाजीची झलक दाखवली. मात्र बाकीच्या गोलंदाजांवर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तुटून पडल्याचे दिसून आले.

काही ना काही कारणामुळे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्माचा फिटनेसबाबत. रोहित शर्माच्या फिटनेसबाबत कोणीही स्पष्टपणे बोलताना दिसून आलं नाही. दोन दिवसापूर्वीच विराट कोहलीने रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मला काही स्पष्ट माहिती नाही. ई-मेल द्वारे मला रोहित शर्माची 11 डिसेंबरला एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट होणार आहे. एवढी माहिती मिळाली आहे. याचा अर्थ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी उपलब्ध होणार आहे की नाही? याविषयी खूप मोठे प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. या सगळ्या प्रकरणाचा भारतीय संघाच्या खेळावर काही परिणाम तर होणार नाही ना? अशी शंका चाहत्यांच्या मनात होती. या प्रकरणाचा संघाच्या खेळावर काही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही,मात्र सध्याच्या संघात बऱ्याचशा त्रुटी आहेत,हे मात्र नाकारता येणार नाही.

भारत पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा फलंदाज आणि पाच गोलंदाज घेऊन मैदानात उतरला. यामध्ये पाचवा ऑप्शन हा ऑल राऊंडर रवींद्र जडेजाच्या रूपात होता. याचा अर्थ भारत अवघ्या चार स्पेशलिस्ट गोलंदाजांना घेऊन मैदानात उतरला होता. विशेष म्हणजे आपल्या गोलंदाजीची मदार ज्या गोलंदाजावर आहे,त्या गोलंदाजाला शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यात फक्त एक बळी मिळवता आला आहे. तोही कालच्या सामन्यात. आपण जसप्रीत बुमराह विषयी बोलतोय. जसप्रीत बुमराहला २८२ चेंडूनंतर बळी मिळवता आला आहे. शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला एक गडी बाद करण्यात यश आले. जसप्रीत बुमराहने जरी या सामन्यात एक गडी बाद केला असला तरी, त्याने दहा षटकांत तब्बल ७३ धावा दिल्या आहेत, हेही विसरता येणार नाही.‌ हा एक चिंतेचा विषय नक्कीच राहिला आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना जसप्रीत बुमराहला शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्‍यात फक्‍त एक बळी मिळवता आला आहे. यावर विश्वासही बसला नसेल, मात्र हे खरे आहे. जसप्रीत बुमराहने शेवटच्या पाच एकदिवसीय सामन्यात तब्बल 282 चेंडू टाकून एक गडी बाद केला आहे. याविषयी आयसीसीने देखील ट्वीट करून माहिती दिली आहे. या ट्वीटला इंग्लंडचा जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनेही भन्नाट अशी कमेंट केली आहे.

भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात जरी फलंदाजी उत्तम केली असली तरी,गोलंदाजी हा विषय चिंतेचा राहीला आहे. दुसऱ्या सामन्यात देखील गोलंदाजीचा असणारा हा प्रश्न काही मिटताना दिसत नाही. त्याचे कारण म्हणजे सध्या भारताकडे एकही मिडीयम पेसर ऑलराऊंडर नाही. एखाद्या सामन्यात जर दुर्दैवाने एखादा गोलंदाज दुखापत झाला तर, त्याची राहिलेली उर्वरित षटके कोण टाकणार? हा खूप मोठा प्रश्न टिम इंडिया समोर उभा राहणार आहे. याउलट काल ऑस्ट्रेलियाच्या ऑल राऊंडर मार्कस स्टोइनिसला दुखापत झाली,तर त्याची उर्वरित षटके ही ग्लेन मॅक्सवेलने पूर्ण केली. ही घटना काल भारतीय संघासोबत घडली असती तर भारताने दुखापत झालेल्या गोलंदाजाची राहिलेली षटके कशी पूर्ण केली असती? या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लवकरात लवकर शोधावे लागेल. अन्यथा आपण मोठ्या स्पर्धेमध्ये फक्त सहभागा पुरतेच राहू!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.