सतत निवडणुकांमुळे देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतोय;नरेंद्र मोदी
संविधान दिनाचे औचित्य साधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ‘वन नेशन वन इलेक्शन’ याविषयी खूप गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. फक्त विचारच नाही तर,ही देशाची गरज असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी उद्देशून म्हटलं.
संविधान दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनेक विषयावर आपले मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन वन इलेक्शन’ याविषयी खूप गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26/11 अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेले जवान,पोलीस,आणि नागरिक यांचीही आठवण काढत श्रद्धांजली वाहिली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर संविधान तयार करण्यात ज्या च्या मंडळींचा हात होता, त्या सर्वांना मी नमन करतो, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
सरदार वल्लभाई पटेल आणि महात्मा गांधी यांचीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठवण काढली. महात्मा गांधी यांच्याकडून प्रेरणा! तर सरदार वल्लभाई पटेल यांच्याकडून वचनबद्ध! या दोन महान गुणांना वंदन करण्याचा आजचा दिवस असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
‘वन नेशन वन इलेक्शन’ याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप आत्मीयतेने बोलताना दिसून आले. ‘वन वन एलेक्शन’ याविषयी ते म्हणाले,देशात वारंवार निवडणुका होतात,आणि त्यामुळे वेळ आणि पैसा आपण खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतोय. त्याचबरोबर देशात महिन्याला निवडणुका येत असल्यामुळे देशाचा विकास आणि विकासाचा वेग कमी होतोय. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकासह इतर निवडणुकांमध्ये देखील एकाच मतदान यादीचा वापर होणं गरजेचे आहे. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.