गणेश होळकर यांची पुरंदर तालुकाध्यक्ष पदी निवड
बारामती तालुक्यातील होळ गावातील तरुण तडफदार युवा नेतृत्व गणेश खंडेराव होळकर यांची शिवसेना प्रणित हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेना पुरंदर तालुका अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. बारामती व पुरंदर तालुक्यात अविनाश यांचे चांगले नेटवर्क असल्यामुळे ते आपल्या व्यवसाय जपून सामाजिक कार्यात सुध्दा कार्यरत असतात.
या कार्यक्रमावेळी बारामती तालुक्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते व युवा नेते दीपक वाघ, डाॅ.नितिन माने पुणे जिल्हा चिटणीस व हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे इतर मान्यवर उपस्थित होते.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
Comments are closed.