जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल तर, एटीएम ग्रीन पिन, एटीएम पिन मिळवा एका कॉलवर!
जर तुम्ही एसबीआयचे नवीन एटीएम धारक असाल आणि तुम्हाला एटीएमचा ग्रीन पिन,एटीएम पिन हवा असेल तर, तुम्हाला त्या शाखेच्या एटीएममध्ये जाण्याची काहीही आवश्यकता नाही. तुम्ही फक्त एका कॉलवर एटीएम पिन मिळवू शकता. जर तुम्हाला या विषयी माहिती हवी असेल, तर संपूर्ण बातमी वाचने आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांचा त्रास कमी व्हावा यासाठी,आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती शेअर केली आहे. ही माहिती एटीएम धारकांसाठी एक पर्वणीच आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक वेळा ग्रीन पिन, एमटीएम पिन,जनरेट करण्यासाठी काही अडचणी येत असतात,त्यामुळे आपल्याला अनेक वेळा बँकेतही हेलपाटे मारावे लागतात. मात्र एटीएम ग्रीन पिन, एटीएम पिन मिळवण्यासाठी आपल्याला एटीएममध्ये किंवा बँकेत जाण्याची काहीही आवश्यकता नाही.
तुम्ही एसबीआय धारक असाल,तर ग्रीन पिन, एटीएम पिन तुम्हाला एका कॉलवर मिळणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने यासंबंधीचा एक टोल फ्री क्रमांक शेअर केला आहे. त्या टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरून कॉल करायचा आहे. आणि त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून तुम्ही एटीएमचा ग्रीन पिन,एटीएम पिन मिळवू शकता.
१८००११२२११/१८००४२५३८०० या दोन्ही क्रमांकामधील कोणत्याही क्रमांकावर, तुम्ही तुमच्या रजिस्टर असणाऱ्या मोबाईल नंबरवरून कॉल करा. त्यानंतर त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा. आणि ग्रीन पिन, आणि एटीएम पिन त्वरित मिळावा.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम