नायगाव तालुक्यामधील मधील माजरंम गावात साकारणार गाव जल सुरक्षा व शाश्वत आराखडा
सेवावर्धिनी व संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून साकारत आहे जलदुत प्रकल्प
सेवावर्धिनी व अॕटलास काॕपको संस्थेचा संयुक्त उपक्रम मांजरम ता.नायगाव जिल्हा नांदेड येथे संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी व सेवावर्धिनी संस्था पुणे यांनी एकत्रितपणे अतिशय महत्वाचा जलदुत प्रकल्प लोकसहभागाच्या माध्यमातून होत निर्माण आहे. गाव पातळीवर पाणी वापर, पाण्याचे महत्व व पाण्याचे व्यवस्थापन त्याचसोबत मृद व जलसंधारण कामाची शाश्वतता निर्माण करणे व गावात जलव्यवस्थापन समितीद्वारे पाणलोट प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा उद्देश हा जलदुत प्रकल्पाचा असणार आहे.
सदरील प्रकल्पाच्या अनुषंगाने दि.20 नोव्हेंबर रोजी जल सुरक्षा व शाश्वत आराखडा याच्या संदर्भात प्रबोधनपर कार्यक्रम जेष्ठ नागरिक श्री गोपाळ पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले आहेत. या प्रसंगी सेवावर्धिनी संस्था पुणे येथील अधिकारी श्री हर्षण पाटील यांनी गावक-यांना जल सुरक्षा व शाश्वतता आराखडा तयार कसा करायचा याच्या बाबतीत मार्गदर्शन केले.
शिवारातील जमिन,जंगल ,पाणी तसेच खडकाचा अभ्यास यामधून पाण्याचा ताळेबंद मांडणे व मृद ,जलसंधारण हा उपक्रम प्रस्तावित करणे तसेच प्रकल्प अंमलबजावणीसाठी खाजगी कंपनी,संस्था व शासनस्तरावर जलव्यवस्थापन समितीद्वारे पाठपुरावा करणे व एकंदरीत गाव पाणीदार बनवून गावाचा सर्वांगिण विकास साधणे इत्यादी बाबत गावक-यांना प्रेरित करुन गावात पाणलोट चळवळ तयार करण्याचे आवाहन केले.
जलदुत श्री गंगाधर कानगुलवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व श्री शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले . या कार्यक्रमासाठी श्री भास्करराव गायकवाड, संभाजी पा. शिंदे, सुर्यकांत पा.शिंदे, बालाजी शिंदे, विश्वनाथ पा. शिंदे, व्यंकट शिंदे , व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री विश्वनाथ पाटील शिंदे,व्यंकटराव शिंदे व शिवाजी गायकवाड यांनी मेहनत घेतली.
महत्वाचे म्हणजे कोरोणा च्या सर्व नियमांचे पालन करून सोशल अंतर ठेऊन हा क्रार्यक्रम पार पाडण्यात आला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम