रकुल प्रीतने पुन्हा केले घायाळ! बोल्डणेस बरोबर स्माईलचही कौतुक

0

अनेक बॉलीवुड एक्ट्रेसने मालदीव वेकेशनवरचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट करून पोस्ट केले आहेत. काही फोटोंना चाहत्यांकडून ट्रोल करण्यात आलं, तर काही फोटोंचे चाहत्यांनी कौतुकही केल्याचे दिसून आले. दिशा पटानी,तारा सुतारिया यांच्यानंतर आता रकुल प्रीत सिंहनेही आपल्या सौंदर्याचा आणि बोल्डनेसचा जलवा दाखवला आहे.

रकुल प्रीत सध्या आपल्या कुटुंबासोबत वेकेशनसाठी मालदीवला गेली आहे. अभिनेत्री रकुल प्रीत ही आपला फिटनेस विषयी खूप काळजी घेताना दिसते.

https://www.instagram.com/p/CH11DjihAdS/?igshid=kmfh3vkzu0d8

वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ फोटो ती नेहमी आपल्या सोशल अकाउंटवरून शेअर करत असते. काल तिने असाच एक बिकिनीवरचा मालदीव बिचवर वर्कआउट करतानाचा फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट केला होता. या फोटोला तिने ‘And getting my dose of vitamin D by the sea’ असं कॅप्शन दिलं होतं. रकुलच्या या फोटोचे चाहत्यांनी कौतुक केले होते. आज पुन्हा एकदा गोड स्माईल असणारा बिकिनीवरचा फोटो तिने इंस्टाग्राम वर पोस्ट केला आहे.

रकुल प्रीतने आज ऑरेंज रंगाची बिकिनी घातल्याचा फोटो आपला इंस्टाग्रामवरून पोस्ट केला आहे. सौंदर्य आणि बोल्डनेस बरोबर या फोटोमध्ये तिच्या गोड स्माईलचेही चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या गोड स्माईलच सगळं श्रेय तिने तिच्या वडिलांना दिलं आहे. कारण हा फोटो वडलांनी कॅप्चर केला आहे,असं ‘ति’ या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हणतेय.

टायगर श्रॉफ सोबत मालदीव वेकेशनवर गेलेल्या, दिशा पटाणीने मालदीव बिचवर बिकिनीवरचा एक फोटो पोस्ट करत,आपल्या सौंदर्याचा आणि बोल्डनेसचा जलवा दाखवला होता. या फोटोला काही वेळातच तीस लाखापेक्षा जास्त लाइक्स मिळाले होते. तर काहींनी ट्रोलही केले होते. दिशा पटाणी नंतर, तारा सुतारिया हीने देखील बीचवर लाल रंगाच्या बिकिनीवरचा फोटो पोस्ट करत, आपल्या सौंदर्याची आणि बोल्डनेसची झलक दाखवली होती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.