आपल्या अजब वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणारी बॉलीवुड एक्ट्रेस कंगना राणावत हीने काल पुन्हा एकदा झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि इंदिरा गांधी यांच्याविषयी अजब वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र सरकार आणि कंगना राणावत हा वाद ताजा असतानाच कंगणा राणावतने पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केले आहे. काँग्रेसने राणी लक्ष्मीबाईच्या जन्मतारखेत हेराफेरी केल्याचा दावा कंगना राणावत हीने केला आहे. कंगना राणावतने केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.
इंदिरा गांधी आणि राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस हा 19 नोव्हेंबर या एकाच दिवशी येतो. हा योगायोग नसून काँग्रेसने यामध्ये हेराफेरी केली आहे. इंदिरा गांधी आणि राणी लक्ष्मीबाई यांचा जन्मदिवस हा एकाच दिवशी येण्यासाठी, कॉंग्रेसने इतिहासामध्येच बदल केल्याचा अजब दावा कंगना राणावतने केला आहे.
कंगना राणावत आपल्या अजब वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून, कंगनाने शिवसेना आणि राज्य सरकारला थेट अंगावर घेतलं होतं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर कंगना म्हणाली होती, जो बायडन यांचे सरकार कोसळून डोनाल्ड ट्रम्प लवकरच सत्तेवर येतील.
राज्य सरकार आणि कंगणा यांच्यामध्ये मोठा वाद झाल्यानंतर केंद्र सरकारने कंगनाला वाय प्लस सुरक्षाही पुरवली होती.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम