बोल्ड सीन देताना अवघडल्यासारखे वाटत होते!
दंगल फेम सान्या मल्होत्राचा बहुचर्चित ‘लुडो’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाविषयी तीने अनेक खुलासे केले असून ती आदित्य रॉय कपूर सोबत दिलेल्या बोल्डसीन विषयी देखील मनमोकळेपणाने बोलली आहे.
या चित्रपटामध्ये सान्या मल्होत्रा हीने अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्यासोबत काम केले आहे.
या चित्रपटातील सान्या आणि आदित्यचा बोल्ड सीन सध्या खूपच चर्चेत विषय बनला आहे.
आदित्य सोबत बोल्ड सीन चित्रित करताना, सान्या मल्होत्राची नेमकी स्थिती कशी झाली होत, यावीषयी सान्या मल्होत्राने एका मुलाखतीत सांगितले. या सीन बद्दल सान्या मल्होत्रा मनमोकळेपणाने बोलली.“लुडो फिल्म मध्ये मी आदित्य मल्होत्रा सोबत काम करणार आहे,हे मला कळल्यावर मी माझ्या मैत्रिणींना लगेच सांगितलं. माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणींना जास्त आनंद झाला होता. मात्र,नंतर आदित्यसोबत या फिल्म मध्ये माझे बोल्ड सीन असल्याचे माझ्या लक्षात आल्यानंतर मला फार अवघडल्यासारखं झालं होतं. असं सान्या मल्होत्रा म्हणाली.
पुढे ती म्हणाली, “बोल्ड सीन देताना मला फार वेगळच वाटत होतं, कारण आजुबाजूला बरेच लोक होते, कॅमेरा होता त्यामुळे मी फार नाराज झाले होते. एक तर मी यापूर्वी आदित्यला फारशी ओळखत नव्हते. आदित्यसोबत काम करण्याचा अनुभव नव्हता. मात्र, हे बोल्ड सीन देताना आदित्यने मला फार कंफर्टेबल केलं. माझ्या मनातील भीती आणि अवघडलेपणा त्याने कमी करण्यास मदत केली.
‘लुडो’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील आदित्य व सान्या मल्होत्रा यांच्या लग्नाआधीची सेक्स क्लिप व्हायरल होते. सान्या आणि आदित्य आणि ही क्लीप सोशल मीडियावरुन काढून टाकण्याच्या हे दोघं एकत्र येतात. असं या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलं आहे.
खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा
https://chat.whatsapp.com/GZ3Mxtz4uge3E7AFV6XFzL
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम