रोहित पवार जेव्हा,हो भावा! म्हणतात तेव्हा…
वुहानमध्ये पहिला कोरोणा रुग्ण सापडला होता त्यास काल एक वर्ष झालं. यानिमित्त काल रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयी एक ट्विट केलं होतं.
रोहित पवार यांनी याविषयी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करत म्हटलं होतं, वुहानमध्ये (चीन) #Corona चा पहिला रुग्ण सापडलेल्या घटनेला आज एक वर्ष झालं.अजूनही यावर लस सापडली नाही. कोरोनाचा धोकाही टळलेला नाही. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःची,कुटुंबाची व समाजाची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्कचा वापर,शारीरिक अंतर ठेवणे,गर्दी टाळणे याला लस येईपर्यंत पर्याय नाही. असं रोहित पवार यांनी म्हटले होते.
रोहित पवारांनी केलेल्या या ट्विटला एका युजरने, भावा अजून नियम पाळायचे ? कोरोना काय अजून १० वर्ष जाणार नाही मग काय १० वर्ष नियमच पाळत बसायचे का? असा रिप्लाय दिला होता.
युजरने दिलेल्या रिप्लायला रोहित पवारांनीही त्याला त्याच्याच शब्दात उत्तर देत, सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. रोहित पवार यांनी या युजर्सला रिप्लाय देत म्हटले, हो भावा!
हो भावा!
आपल्या सर्वांना नियम हे पाळावेच लागतील, त्याशिवाय पर्याय नाही. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, अंतर ठेवणं या चांगल्या सवयीची आपल्याला काय अडचण आहे? संपूर्ण राज्य में आपलं कुटुंब आहे, या कुटुंबासाठी नाही पण किमान स्वतःच्या कुटुंबासाठी तरी नियम पाळा! असं रोहित पवार यांनी त्याच्या रिप्लायला उत्तर दिलं. रोहित पवार यांनी त्याला दिलेले फ्लाईंग मुळे रोहित पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहिला मिळतोय.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम