विरोधकांच्या गोटात जाऊन चंद्रकांत पाटलांची मोर्चेबांधणी सुरू!
पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुका अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मतदान एक डिसेंबरला होणार असून यासाठी अनेक पक्षांनी आपली मोट बांधण्यास कोणतीही कसर बाकी ठेवली नसल्याचे दिसून येत आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या निवडणुकीकडे विशेष लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. खासकरून पुणे पदवीधर मतदारसंघात. चंद्रकांत पाटील यांनी आता विविध भागात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये ते विरोधकांच्या गोटात जाऊनही मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत.
सांगली जिल्ह्यामध्ये 84 हजार पेक्षा जास्त मतदार असून या जिल्ह्यांमध्ये त्यांनी जोर लावल्याचे दिसून येत आहे. काल त्यांनी जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्या कार्याला अचानक भेट देऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
चंद्रकांत पाटील यांनी आनंदराव पवार यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांच्या सोबत चर्चा केली. विशेष म्हणजे ही चर्चा बंद दाराआड झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम