उमेदवाराला आपल्या गुन्ह्याची माहिती प्रसारित करणे बंधनकारक आहे. हे आपणास माहीत आहे का?

0

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुका अंतिम टप्प्यावर येऊन ठेपल्या आहेत. पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकांसाठी मतदान एक डिसेंबरला होणार असून यासाठी अनेक पक्षांनी आपली मोट बांधण्यास कोणतीही कसर बाकी ठेवली नसल्याचे दिसून येत आहे.

पदवीधर मतदार उमेदवारांना आता आपल्यावर असणारे गुन्हे सार्वत्रिक करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. मागील निवडणुकांपासून हा नियम लागू करण्यात आलेला असून निवडणूक काळामध्येच उमेदवाराला, वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यामार्फत तीन वेळा आपल्या गुन्ह्याची माहिती देणं बंधनकारक असणार आहे.

राजकारणामध्ये गुन्हेगारी वृत्तीचे उमेदवार खूप मोठ्या प्रमाणात उभे राहिले जातात,आणि ते निवडूनही येतात. त्यावर अनेक सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतला होता. हे लोकशाहीसाठी खूप घातक असल्याचं मत न्यायालयाने देखील व्यक्त केले होते. यावर आळा घालण्यासाठी आता उमेदवारांना निवडणूक काळामध्येच तीन वेळा आपल्या गुन्ह्याची माहिती वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्या यांना देणे बंधनकारक असणार आहे.

यामुळे मतदारांना उमेदवाराविषयी संपूर्ण माहिती मिळेल. त्याचबरोबर उमेदवाराच्या चारित्र्याची मतदाराला माहिती मिळेल. आणि तो एक उत्कृष्ट उमेदवाराला आपली पसंती देईल,असा या मागचा उद्देश असणार असल्याचे, केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.