फडणवीसांच्या ट्विटला अनिल परब यांचे जोरदार प्रतिउत्तर! काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर!
2019च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये दरी निर्माण होत गेली. भाजप सत्तेपासून दूर फेकला गेला. विधानसभा निकालांच्या आकड्यांचा विचार केला तर,शिवसेना ही किंगमेकरच्या भूमिकेत राहिली.
विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेनेना मुख्यमंत्रीपद हे अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्यावर ठाम राहीली. शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये दरी निर्माण होत गेली. आणि पुढे महाविकास आघाडी हे सरकार स्थापन झाले.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने सेनेवर सातत्याने हमला सुरू केला. सेनेवर टीका करण्याची संधी भाजप कुठेही सोडताना पाहायला मिळाला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून देखील भाजपाने सेनेवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आपल्या ट्विटर अकाउंटवरून आदरांजली वाहणारा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओला देवेंद्र फडणवीस यांनी, “विचारांवर श्रद्धा आणि विधानांवर ठाम” असं कॅप्शन दिलं. देवेंद्र फडणवीस यांचे हे ट्वीट राजकारणाचा एक भाग असल्याचं अनिल परब यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटला अनिल परब यांनी जोरदार उत्तर देत,आमचा मुख्यमंत्री हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानेच बनला आहे. असा सणसणीत टोला लगावला.
आजचा दिवस हा एकमेकांवर टीका करण्याचा नाही. भाजपाला योग्य वेळी नक्की उत्तर मिळेल. असं अनिल परब यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ट्वीटला अनिल परब यांनी दिलेल्या उत्तरामुळे, येणारा काळात हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम