गळा कापून 19 वर्षीय युवकाची हत्या!

0

गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशमध्ये सातत्याने बलात्काराच्या,अत्याचाराच्या घटना वारंवार घडताना पाहायला मिळत आहेत.

बीजेपीची सत्ता नसलेल्या एखाद्या राज्यात बलात्कार सारखी एखादी घटना घडली तर, ती संपूर्ण देशभर पसरते. मात्र ज्या राज्यात बीजेपीची सत्ता आहे त्या राज्यात सातत्याने अशा घटना घडतात. मात्र अशा घटनांची कुठे फारशी चर्चा होत नाही. हे खूप भयान आहे,अशी टीका,विरोधकांकडून सातत्याने होताना पाहायला मिळते. मात्र उत्तर प्रदेश राज्याला याचा काही फरक पडताना पहिला मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांत माणुसकीला काळिमा फासणारा अशा अनेक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्याचे पाहायला मिळाले आहे.

दोन दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलीची निर्घुन हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडली. घटना केल्यानंतर या मुलीचे काळीज काढून नेण्यात आले. एवढी ही भयान घटना होती.

आज पुन्हा एकदा प्रयागराजमध्ये 19 वर्षीय युवकाची धारधार शस्त्राने गळा कापून हत्या करण्यात आली. करछना मधील केचुआ गावामध्ये ही दुर्दैवी घटना घडली. हत्या झालेल्या युवकाचे नाव मुकेश कुमार पटेल असून तो गोव्यामधे एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होता. अशी प्राथमिक माहिती आहे.

मुकेश कुमार पटेल या युवकाचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. याविषयी अधिक माहिती अजून स्पष्ट झालेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.