असा सरपंच कुठे आहे काय? लोकांची दिवाळी गोड होण्यासाठी घेतला हा निर्णय..

0
जाहिराती साठी संपर्क करा व्हॉट्सअँप फक्त +919373403078

दिवाळी हा सण गावाच्या लोकांसाठी गोड करण्यासाठी गावाच्या सरपंचांनी गावात आदर्श उपक्रम राबवला आहे.पटोद्याच्या सरपंचांनी केली गावकऱ्यांची दिवाळी गोड. प्रत्येक कुटुंबाला २० रुपयांमध्ये २५ किलो साखरेचे वाटप केले. आदर्श गावच्या सरपंच यांचा हा आदर्श असा उपक्रम. पाटोदा हे औरंगाबाद जिल्ह्यातील ३३०० लोकसंख्या असलेले हे गाव. पाटोदा गावातील नागरिकांनी या वर्षी कोरोणा या भयानक आजाराचे संकट असून देखील १०० टक्के टॅक्स भरला. त्यामुळे सरपंच भास्करराव पेरे यांनी गावकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या वर्षी ५०० रुपयांमध्ये २५ किलो साखर गावकऱ्यांना देण्यात आली आहे. पुढच्या वर्षी साखर मोफत देण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. गावकऱ्यांना पैशात किती नफा झाला हे महत्वाचे नाही.तर त्याचा चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो हे महत्वाचे आहे, असे पेरे म्हणतात.

सरपंच भास्करराव पेरे म्हणतात,”आमच्या ग्रामपंचायतीने असा विचार केला की दीपावलीचा सन आहे ह्या वर्षी कोरोनामुळे लोक अडचणी मध्ये आहेत. त्यामुळे लोकांना काहीतरी गोड बातमी किंवा लोकांना दिलासा देता येईल असे काही करता येईल का यावर आमचा विचार सुरू होता. म्हणून मोफत २५ किलो साखर देण्याचा निर्णय घेतला पण २५ किलो मोफत साखर देणे ग्रामपंचायतीला जड होते”. सरपंच भास्करराव पेरे यांनी गावकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत . अंघोळीला गरम पाणी, पिण्यासाठी शुद्ध पाणी, टॅक्स भरणाऱ्याला दळण फुकट, असे अनेक उप्रकमा या गावाचे सरपंच राबवत असतात.

खालील लिंक वरून आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा.

https://chat.whatsapp.com/JtkF5Gty52NJmGfcl5NBCT

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.