सेमीस्टर परीक्षा देखील ऑनलाईन होणार, मात्र नियमात बदल होण्याची शक्यता.
अंतिम वर्षांच्या परीक्षांप्रमाणेच आता मुंबई विद्यापीठाच्या या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन होणार आहेत. परंतु अंतिम वर्षांच्या निकालातील गुणांची उधळण पाहून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात थोडीफार बदल होण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाचे अनेक अभ्यासक्रम सत्र पॅटर्न प्रमाणेच आहेत. म्हणजेच प्रत्येक सत्राला वेगवेगळे विषय अभ्यासण्यासाठी असतात आणि प्रत्येक सत्राची परीक्षाही होते. गेल्या शैक्षणिक वर्षांतील अंतिम वर्षांच्या कॉलेज स्तरावर ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यांचे निकालही जाहीर झाले. घरी बसून परीक्षा देण्याची सुट, बहुपर्यायी प्रश्न पत्रिका, कॉलेज पुरवण्यात आलेले प्रश्नसंच यांमुळे निकालात मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली.
अंतिम वर्षांचे निकाल २५ ते ३० टक्के एवढे वाढले. कॉमर्स विद्याशाखेतही बऱ्याच विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. आता या शैक्षणिक वर्षांतील सत्र परीक्षाही ऑनलाइन घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र, गुणांची आकडेवारी रोखण्यासाठी परीक्षेच्या आणि प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात काही बदल होण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.
खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉईन व्हा.
https://chat.whatsapp.com/G4q5lanvK3CDdowcrPToQc
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम