रस्ता रुंदीकरणाबाबत जनमानसात संभ्रमावस्था

0

गणेश देसाई ,महाराष्ट्र लोकशाही प्रतिनिधी,

सांगली जिल्ह्यातील पुसेसावळी, वाळवा – बोरगाव,बहे,तांबे,कासेगाव,टाकवे,येळापूर,- चांदोली रस्ता हा रा. मा. क्र. १५८ वर रुंदीकरणासह सुधारणा करणेबाबत शिराळा तालुक्यातील संबंधित ग्रामपंचायतींना सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिराळा यांचेमार्फत नुकतेच पत्र प्राप्त झाले. त्यादृष्टीने रुंदीकरणास अडथळा ठरत असलेल्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज लाईन, कूपनलिका व इतर शासकीय बांधकाम यांची माहिती मागवण्यात आली आहे.

सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या मध्यभागातील डाव्या बाजूस ८.०० मीटर व उजव्या बाजूस ८.०० मीटर रुंदीकरण प्रस्तावित आहे. सदरचे काम हे आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्यांतर्गत केले जाणार असून,त्या अनुषंगाने महावितरण, बांधकाम, वन, पाणी – पुरवठा व इतर विभागामार्फत सर्व्हेक्षणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बांधकाम मालकांची नांवे लिहून घेतली जात आहेत.        

वरील रुंदीकरण बाबतीत ग्रामपंचायत स्तरावर पत्राव्यतिरिक्त कुठलीही जादा माहिती उपलब्ध नसलेने जनमानसांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. याबाबतीतील सखोल खुलासा बांधकाम विभागाकडून व्हावा. अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे. स्वतःचे रहाते घर,जनावरांचे शेड, शौचालय, फळझाडे, विहीर, कूपनलिका तसेच रस्त्याच्या बाजूस असणारी शेतजमीन या सर्व बाबी रस्त्याच्या रुंदीकरणामधे येत असलेने त्याबाबत शासन स्तरावरून काय उपाययोजना केल्या जाणार आहेत? तसेच नुकसान भरपाई माहिती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.