अर्णव च्या अटकेनंतर भाजपचे नेते आक्रमक
अर्णव च्या अटकेनंतर विरोधी पक्ष भाजप चांगलाच आक्रमक झाला आहे. दिल्लीचे नेत्यांपासून महाराष्ट्रातील नेत्यांनी आणीबाणी सारखी वेळ आल्याचे बोलले आहे. अर्णव गोस्वामी याला अटक होताच भाजप मैदानात उतरले आहे. भाजप कडून महाविकास आघाडी सरकारवर आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण केल्याचा आरोप केला आहे.
यावर विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणतात,” ठाकरे सरकार या राज्यामध्ये आणीबाणी सदृश परिस्थिती निर्माण करू पहात आहे.
चंद्रकांत पाटील म्हणतात,”आणीबाणी मध्ये सुध्दा अशाच प्रकारची अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यानंतर इंदिरा गांधी यांना देखील लोकांनी घरी बसवले होते”.
अर्णव गोस्वामी याला अटक झाली आणि भाजप आक्रमक झाली. भाजपाने अलिबाग च्या कोर्टाबाहेर सुध्दा आंदोलन केले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम