सरकार विरोधी लिहिणाऱ्या माध्यमांवर कारवाई करताना, अभिव्यक्ति स्वातंत्र आठवत नाही का;रोहित पवार

0

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक भारतचे पत्रकार अर्नब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. अर्नब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर भाजपाच्या अनेक नेतेमंडळींनी निदर्शन केले.

भाजपा नेते मंडळींनी अर्नब गोस्वामी अटकेविरोधात निदर्शने,करत लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा निषेध असो,अशा घोषणा दिल्या. त्याचबरोबर विचार स्वातंत्र्यावर गदा आणणार्‍या ठाकरे सरकारचा निषेध असो. अशाही घोषणा दिल्या.

सूडबुद्धीने कारवाई करणाऱ्या सोनिया गांधी,शरद पवार,उद्धव ठाकरे यांचा निषेध असो. सोनिया जिसकी मम्मी है,वह सरकार निकम्मी है, अशा अजब घोषणाही भाजप नेते मंडळींनी दिल्या.

अर्नब गोस्वामी अटके विरोधात भाजपच्या नेतेमंडळींनी केलेल्या निदर्शनाला राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे, सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर द वायर, एनडीटीव्ही, द प्रिंट, या माध्यमांना अटक करून वेगवेगळ्या माध्यमातून त्रास देताना या मंडळींना आणीबाणी आठवत नाही. मात्र पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या अभिनेत्यावर कारवाई झाली तर लगेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य आठवतं.

असं जोरदार प्रतिउत्तर रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन दिलं आहे. रोहित पवार यांनी पत्रकार अर्नब गोस्वामी यांची अभिनेता म्हणूनही खिल्ली उडवली आहे.

५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी अर्नब गोस्वामीने पैसे थकविल्याने आत्महत्या करत असल्याचं आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं असल्याचा आरोप आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.