पवार साहेबांनी भर पावसात 18 ऑक्टोबरला साताऱ्यामध्ये केलेल्या सभेची वर्षपूर्ती राष्ट्रवादीने आपल्या सोशल मिडिया अकाउंट् वरून साजरी केली होती.
त्यावेळी पवार साहेबांनी केलेली सभेला तरुणांकडून खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला होता. एवढेच नव्हे तर या सभेनंतर महाराष्ट्रातील राजकारणाला एक नवी कलाटणी मिळाली होती. भाजप एक हाती सत्ता आणेल असं चित्र असताना दोन्ही काँग्रेसने जबरदस्त मुसंडी मारली. पुढे हे दोन्ही पक्ष सत्तेत सहभागीही झाले. भर पावसातली झालेली पवार साहेबांची ही सभा ऐतिहासिक ठरली.
पवार साहेबांनी केलेल्या साताऱ्याच्या पावसातील सभेची आज पुन्हा एकदा चर्चा झाली. पवार साहेबांच्या पावसातील सभेची चर्चा होण्याचे कारण म्हणजे,डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा राहिलेले,जो बिडेन एक रॅली करत असताना,अचानकपणे पाऊस यायला सुरुवात झाली. आणि त्यांनी त्या पावसामध्ये सभा केली. सोशल मीडियावर याची मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागली.
कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील या सभेचा फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी या सभेची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्याच्या सभेशी केली.
जो बीडेन यांच्या पावसातल्या सभेची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्याच्या पावसातल्या सभेशी करत,रोहित पवार म्हणाले,जेंव्हा सभेत जोरदार पाऊस येत असतो,परंतु नेता आणि जनता तसूभरही विचलित होत नाही. तेंव्हा तो पाऊस जुन्याला वाहून लावण्यासाठी आणि
नव्याला न्हाऊ घालण्यासाठी
आलेला असतो.
२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज आहे. असं रोहित पवार आपल्या ट्विटर अकाऊंटवर म्हणाले.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम