नरेश भोरे या सामाजिक कार्यकर्त्याने नगरपालिकेत स्वतःला पेटवून घेतले.

0

ही धक्कादायक घटना इचलकरंजी या ठिकाणी घडली आहे. इचलकरंजी नगरपालिकेने भ्रष्टाचार केल्याचा आरोप नरेश भोरे यांनी केला आहे. भ्रष्टाचाराबाबत नरेश भोरे यांनी नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयमध्ये तक्रार केली होती. नगरपालिकेमध्ये मोरे यांनी स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. सध्या भोरे यांची प्रकृती गंभीर आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भोरे यांनी हे पाऊल उचलले आहे. इचलकरंजी शहरामधील ही एक धक्कादायक घटना आहे.

नरेश भोरे हा सामाजिक कार्यकर्ता ५० ते ६० % जळालेले आहेत. त्यांच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. त्याला उपचारासाठी तत्काळ दाखल करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवून नरेश भोरे यांनी नगरपालिकेला या भ्रष्टाचारामध्ये चौकशी करण्यासाठी विनंती अर्ज केले होते व नगरपालिकेने यामध्ये हे दुर्लक्ष केले तर मी पेटवून घेईन असा इशारा देखील नरेश भोरे यांनी इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाला दिला होता.
मात्र तरीही नगरपालिका प्रशासनाने भोरे यांच्या मागणीला डावलले व दुर्लक्ष केले.

धक्कादायक बाब म्हणजे नरेश भोरे यांनी पेटवून घेतले असताना येथील लोक ग्लास मध्ये पाणी आणून आग विझवताना पहायला मिळत आहेत.
काही लोक मोबाईल घेऊन त्याचा व्हिडिओ काढत होते, मात्र त्याला विझवण्याचा प्रयत्न करत नव्हते .ही माणुसकीला काळीमा फासणारी बाब होय.

नगरपालिका प्रशासनाने नरेश भोरे या सामाजिक कार्यकर्त्याच्या मागणीकडे वारंवार दुर्लक्ष केले. नरेश भोरे यांने नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाला याबाबत चौकशी करण्याची विनंती केली. मात्र तरीही या दोन्ही ठिकाणच्या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची चौकशी केली नसल्याचे उघड झाले आहे.

जर वेळी आपण पाहत असतो इचलकरंजी नगरपालिकेमध्ये वेगवेगळे कार्यकर्ते मुद्दा उपस्थित करून आंदोलन करत असतात, मात्र तरीही नगरपालिका प्रशासन त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याला भ्रष्टाचाराबाबतच्या चौकशीच्या मागणीसाठी स्वतःला पेटवून घ्यावे लागते, ही अत्यंत घृणास्पद बाब आहे. त्याने अनेक वेळा प्रशासनाला पत्रव्यवहार केला आहे मात्र प्रशासन नेहमीच करू बघू या भूमिकेमध्येच आहे.

नरेश भोरे हा भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवतो किंवा चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवतो म्हणून जाणीवपूर्वक नरेश भोरे याला अडकवण्याचा प्रयत्न देखील केला गेला आहे. आपण योग्य गोष्टीसाठी मागणी करत आहोत तरीही आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे आपल्याकडे स्वतःला पेटवून घेणे हाच एकमेव मार्ग आहे, असे नरेश भोरे यांना वाटले.


त्याला विजवण्यासाठी देखील अग्निशामक यंत्रणा उशिरा पोहोचली. आता दोषींवर ती कारवाई होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.