कोंबड्यांची पिल्ले,मासे विकून रोहित पवारांनी धंदा केला,समाजकारण नाही!

0

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजपचे उपाध्यक्ष राम शिंदे यांनी टिका केली आहे. अहमदनगरमध्ये एका पत्रकार परिषदेत राम शिंदे बोलत होते.

खूप कमी काळात आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून तरुणांमध्ये प्रसिद्ध झालेले रोहित पवार आपल्या कामाच्या संदर्भात अनेक नेते मंडळींना भेटत असतात. चर्चा करताना पाहायला मिळतात. यासंदर्भातली माहिती ते आपल्या सोशल अकाऊंटवरून नेहमी देत असतात. रोहित पवार हे पवार घरातले असले तरी,ते आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले.

कर्जत जामखेड या मतदारसंघात भाजपचा बोलबाला राहिला आहे. या मतदारसंघात 1995 पासून भाजपची सत्ता होती. त्याचबरोबर गेली दोन विधानसभा राम शिंदे याच मतदारसंघातून आमदार होते. भाजपच्या बालेकिल्ल्याला रोहित पवारांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुरूंग लावला, आणि विजय मिळवला.

काल शुक्रवारी राम शिंदे यांनी अहमदनगरमधील पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी कोंबड्यांची पिल्ले,मासे आणि बी बियाणे विकून समाजकार्य नाही तर, धंदा केला. अशी जोरदार टीका केली.

एका वर्षापूर्वी मी ज्या कामांचे उद्घाटन मंत्र्यांच्या हस्ते केलं होतं, आज ते त्याच कामाचे भूमिपूजन करतायत. अशीही टीका राम शिंदे आणि रोहित पवारांवर केली. त्याचबरोबर तुकाई उपसा सिंचन यासह या मतदार संघातील अनेक कामे रोहित पवार यांनी बंद पाडली. एकही नवीन काम आणण्याचं काम केलं नाही. अशी जळजळीत टीका रोहित पवारांवर राम शिंदे यांनी केली आहे.

त्यांनी निवडणुकांपूर्वी बारामती पॅटर्नचा खूप बडेजाव केला. मात्र कर्जत जामखेड नागरिकांसाठी त्यांनी एका वर्षात एकही काम आणलं नाही, या लोकांची त्यांनी निराशा केली असून बारामती पॅटर्न सपशेल अपयशी ठरला आहे. अशी जळजळीत टीका राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्यावर केली आहे.

विरोधकांच्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात रोहित पवार कोणतीही कसर ठेवत नसल्याचे अलिकडे दिसून आले आहे. पुराव्यानिशी ते विरोधकांना सडेतोड उत्तर देतात. नुकत्याच गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेलाही रोहीत पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. आता राम शिंदे यांच्या टिकेकडे रोहित पवार कसे पाहतात? हे पाहणे खूप ओत्सुक्याचे ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.