एकनाथ खडसे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप!

0

गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे ज्येष्ठ नेते,माजी महसूल मंत्री,एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश हा खूप चर्चेचा विषय राहिला. जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना आपलं मंत्रीपद गमवावं लागलं. पुढे न्यायालयीन लढाईत एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं समोर आलं. मात्र त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.

महाराष्ट्राच्या २०१४च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एकनाथ खडसे,हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र निवडणुकानंतर भाजपच्या दिल्लीच्या ज्येष्ठ मंडळींनी देवेंद्र फडणीस यांना पसंती देत,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

फडणवीस मंत्रिमंडळात एकनाथ खडसे यांना घेतले,मात्र काही महिन्यातच त्यांच्यावर जमीन घोटाळा प्रकरणात आरोप झाला. आणि त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. पुढील न्यायालयीन लढाईत एकनाथ खडसे यांना क्लिनचिट मिळाली. परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. 

भाजपकडून पुढे एकनाथ खडसे  यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. एकनाथ खडसे यांना डावलल्याने एकनाथ खडसे यांनी या संदर्भातील आपली नाराजी प्रसारमाध्यमांसमोर अनेकदा जाहीरपणे व्यक्त केली. आपल्यावर झालेले आरोप एक षडयंत्र होतं,असं त्यानी सांगितलं.

एकनाथ खडसे हे राज्यातील भाजपच्या नेत्यांवर नाराज आहेत. ते भाजपला रामराम ठोकून इतर पक्षात प्रवेश करतील. अशा चर्चा अनेक महिन्यांपासून माध्यमांवर रंगत होत्या. आज त्यांनी मी राष्ट्रवादीत 23 तारखेला पक्षप्रवेश करणार आहे. असं सांगून या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

यापूर्वी देखील त्यांनी माध्यमांसमोर जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आज  त्यांनी पक्ष प्रवेशाची घोषणा करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप गंभीर आरोप देखील केले आहेत.

*देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काय म्हणाले, एकनाथ खडसे*

विरोधकांकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झाले नाहीत. कोणत्याही प्रकारच्या चौकशीची मागणी केली नाही. तरीसुद्धा देवेंद्र फडणीस यांनी भुखंडाच्या घोटाळ्यासंदर्भात माझ्यावर चौकशी लावणी. एवढेच नाही तर विनयभंगाची देखील चौकशी त्यांनी माझ्यावर लावली‌. असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

एकनाथ खडसे पुढे म्हणाले, एवढं गलिच्छ राजकारण मी कधीही पाहिले नाही. माणसाचं जीवन उध्वस्त करण्याचं काम यांनी केलं. भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही नेत्यावर मी नाराज नाही. माझं पक्ष सोडण्याचं कारण म्हणजे,फक्त देवेंद्र फडणीस आहेत. असा घणाघात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. मी समोर असताना अधिकाऱ्यांना वेगळे बोलायचे,मी गेल्यावर अधिकाऱ्यांना फोन वेगळे सांगायचे. असा गंभीर आरोप एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. खूप मोठा मानसिक त्रास देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पक्ष सोडण्याची माझी इच्छा नाही, परंतु मला पक्षाबाहेर ढकलण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं. असाही आरोप एकनाथ खडसे यांनी केला.

माझा फक्त एकच गुन्हा आहे. तो म्हणजे मी लाचार नाही,मी कुणाचे पाय चाटत बसणार तर अजिबातच नाही,मी स्पष्टवक्ता आहे. असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.

एखाद्या महिलेला पकडायचं आणि विनयभंगाची केस टाकायची. अशा माणसासोबत काम करणं हे फार कठीण आहे.  आज विनयभंगाची टाकली उद्या बलात्काराची टाकतील. असा घणाघात एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

एकनाथ खडसे यांनी केलेल्या गंभीर आरोपावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय बोलतात? हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.