तुमच्या मधला शेतकरी मेला; प्रवीण दरेकर

0

महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले. उभी पिकं आडवी झाली.

पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फटका बसला. पावसामुळे आणि कोयनेतून सोडलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीला पूर आला. आणि याचा फटका पंढरपूरला मोठ्या प्रमाणात बसल्याचे दिसून आले.

गेल्या तीन-चार दिवसांपासून पंढरपूर सोलापूर विभागांना सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून भेटी देण्याचे सत्र सुरू आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील पंढरपूरला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रसरकारने बिहारला लगेच मदत केली. मात्र महाराष्ट्राला केंद्र सरकार का मदत करत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.

प्रवीण दरेकर यांनी पंढरपूर तालुक्यातील अतिवृष्टी भागांना भेट दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी राजू शेट्टी यांच्यामधील शेतकरी ‘मेला’ आहे,अशी जहरी टीका केली. त्यांच्यामधला शेतकरी मरण्याचं कारण म्हणजे,त्यांना आता राष्ट्रवादीकडून विधान परिषद मिळणार आहे. विधान परिषद मिळणार असल्याने ते आता सरकार विरोधात आंदोलन करत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते बोलत नाहीत,अशी टीका प्रवीण दरेकर यांनी राजू शेट्टींवर केली.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.