TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसंदर्भात महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मिळणार..
TET Exam : उच्च शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं, सरकारी नोकरी (job ) करण्याचं. मात्र प्रत्येकाला हे शक्य होत नाही. अनेकदा सरकारच्या धोरणांचा बळी पडण्याची नामुष्की तरुणांवर (youth) येते. अलीकडे तर या समस्यांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात जखडल्याचा पाहायला मिळतं. जर तुम्ही देखील सरकारी नोकरीचे स्वप्न पाहू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
शिक्षक (teacher) ही अशी नोकरी आहे, जी समाजाला घडवण्याचं काम करते. शिक्षकांवर देशाचे भविष्य अवलंबून असते. समाजात शिक्षकाला विशेष मान असतो. त्यामुळे असंख्य तरुणांची शिक्षक बनण्याची इच्छा असते. परंतु केवळ इच्छा असून चालत नाही, त्यासाठी प्रयत्न आणि सरकाचे धोरण देखील आवश्यक असतं. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि टीईटी परीक्षेसाठी (TET exam 2025) अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे (Maharashtra State Council of Examination) घेण्यात येणाऱ्या टीईटी परीक्षासाठीच्या ऑनलाईन अर्जाची मुदत आता वाढवण्यात आली आहे. 2025 ची टीईटी परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 3 ऑक्टोंबर पर्यंत देण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या मुदतीत वाढ करण्यात आली आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान विस्कळीत झाले. साहजिकच त्यामुळे अनेकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अडचणीचा सामना देखील करावा लागला. यामुळे आता या परिषदेने मुदत वाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता टीईटी परीक्षेकरिता 9 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
अनेकांना चलन भरण्यासाठी देखील अडचणीचा सामना करावा लागत होता. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने या संदर्भात आणखी सुलभता यावी यासाठी, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या साह्याने देखील शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र 9 ऑक्टोंबर नंतर विद्यार्थ्यांना अर्ज कार्यासाठी कोणतीही अतिरिक्त मुदत देण्यात येणार नसल्याचं परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक सांगितले आहे.
हे देखील वाचा 100rs coin RSS: भारतीय चलनावर RSS ची एन्टी; नरेंद्र मोदींनी लाँच केले 100 रुपयांचे हे नाणे..
Peek Pahani : शेतकऱ्याच्या मदतीला सरकार धावलं; पिक पाहणी विषयी सरकारचा मोठा निर्णय..
Maharashtra serveyor recruitment: 903 पदांसाठी या विभागात मोठी भरती; कालपासून अर्ज भरायला सुरुवात..
Haval H 9 SUV: अभिषेकला मिळालेली गाडी आहे जगात भारी; गाडीचे फिचर्स जाणून व्हाल चकित..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम